पिंपरी-चिंचवड

नऊ तालुक्यांत ‘पीएमआरडीए’ कार्यालये

CD

लोगो : पीएमआरडीए

पिंपरी, ता. २५ : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांतर्गत (पीएमआरडीए) ग्रामीण भागासाठी प्रादेशिक आणि तालुकास्‍तरीय कार्यालयाला मंजुरी मिळाली आहे. त्‍यासाठी प्रशासनाकडून जागेची पाहणी केली जात आहे. ‘पीएमआरडीए’ची मोठी हद्द ही ग्रामीण भागात आहे. तेथील नागरिकांना कामानिमित्त आकुर्डी येथील मुख्य कार्यालय किंवा औंध येथील कार्यालयात यावे लागते. तसेच प्राधिकरण क्षेत्रातील भोर, राजगड, मावळ, मुळशी, खेड , हवेली, दौंड, पुरंदर आणि शिरूर या तालुक्यांतील सामान्य जनतेला मुख्य कार्यालय येथे हेलपाटे मारावे लागतात. त्यासाठी वेळ आणि पैसा खर्ची पडतो. हे लक्षात घेता, नागरिकांच्या सोयीसाठी पूर्व, पश्‍चिम, दक्षिण आणि उत्तर अशा चारही दिशांना प्रादेशिक कार्यालये आणि नऊ तालुका कार्यालये स्‍थापन करण्याबाबत आयुक्त योगेश म्हसे यांनी शासनाकडे प्रस्ताव पाठवला होता. या नव्या कार्यालयांसाठी आकृतीबंधातील मनुष्यबळ वापरण्यासही शासनाने परवानगी दिली आहे.

कोट :
चार प्रादेशिक आणि नऊ तालुकास्तरीय कार्यालयांपैकी तालुकास्तरीय कार्यालयासाठी प्राधान्य देण्यात येत आहे. यात तहसील, पंचायत समिती आणि नगरपालिका कार्यालय परिसरात तात्पुरते भाडेतत्वावर किंवा ‘पीएमआरडीए’च्या सुविधेमधील जागेचा शोध घेतला जात आहे.
- शिवप्रसाद बागडी, अधीक्षक अभियंता, अभियांत्रिकी विभाग, पीएमआरडीए.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रोहित शर्मा, विराट कोहली यांची हवा! भारतीय क्रिकेटमध्ये सात वर्षांत जे कधी नाही घडले, ते होणार; चाहत्यांसाठी मेजवानी...

Sharad Pawar: निर्णय झाला! काँग्रेसचं शरद पवारांच्या नावाला समर्थन; एका जागेवरुन 'या' नेत्यांमध्ये सुरु होती रस्सीखेच

Shivneri Bus: एसटीची ‘शिवनेरी’ बस आता राज्यभर धावणार! स्लीपर कोचची एंट्री; कुठून कुठे जाणार? प्रताप सरनाईकांनी सांगितली यादी

Agricultural News : कांदा पुन्हा युद्धात भरडला! इराण-इस्रायल वादामुळे १६ हजार टन कांदा 'होर्मुझ'च्या वाटेत अडकला

Latest Marathi News Live Update : विद्यार्थ्यांना गुणांसोबत संस्कारही द्या - जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

SCROLL FOR NEXT