पिंपरी-चिंचवड

इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्तीसाठी पाठपुरावा करा

CD

पिंपरी, ता. २५ : इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्‍तसाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचा (एसटीपी) प्रस्‍ताव राष्ट्रीय नदी संवर्धन संचालनालय (एनआरसीडी) यांच्याकडे दाखल आहे. त्‍याबाबत संबंधित केंद्रीय मंत्र्यांकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी पीएमआरडीए प्रशासनाने केंद्रीय सहकार राज्‍यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्‍याकडे केली आहे.
इंद्रायणी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हालचाली सुरू केल्या आहेत. इंद्रायणी नदीच्या प्रदूषणमुक्तीबाबत पीएमआरडीए आयुक्त योगेश म्‍हसे यांनी दिल्ली येथे केंद्रीय राज्‍यमंत्री मोहोळ यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यावर मोहोळ यांनीही सकारात्‍मकता दाखवली असल्‍याची माहिती पीएमआरडीए प्रशासनाने दिली.
लोणावळा ते आळंदी म्हणजेच जवळपास ८७ किलोमीटर अंतराच्या टप्प्यात पीएमआरडीएकडून एसटीपी प्रकल्प उभारला जाणार आहे. त्यासाठी जवळपास ७९३ कोटी रुपयांच्‍या निधीला मान्यता मिळाली आहे. सद्यस्थितीमध्ये पीएमआरडीए अंतर्गत असलेल्या लोकवस्तीमधील गटारांचे पाणी थेट नदीपात्रामध्ये मिसळत आहे. त्यामुळे या प्रकल्पांतर्गत ३८ एसटीपी केंद्रे प्रस्तावित आहेत. त्याचप्रमाणे नाल्याचे प्रदूषित पाणी एकत्रित संकलित करण्यासाठी स्वतंत्र वाहिन्या टाकणे, जलपर्णी निर्मूलन आणि घनकचरा व्यवस्थापन या बाबींदेखील त्यामध्ये प्रस्तावित आहेत. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर इंद्रायणीमध्ये सांडपाणी मिसळणार नाही, अशी अपेक्षा आहे.
दिल्‍लीतील एनआरसीडीकडे प्रकल्‍प उभारण्यासाठीचा प्रस्‍ताव २०१९ मध्ये पाठविण्यात आला आहे. त्‍याबाबत केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी पीएमआरडीए आयुक्‍त योगेश म्‍हसे यांनी केंद्रीय राज्‍यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्‍याकडे केली. तसेच प्रस्‍तावाला त्‍वरित मंजुरी मिळवण्याबाबत पाठपुरावा करावा, अशी विनंतीही म्हसे यांनी मोहोळ यांना केली.

दिल्‍ली येथे केंद्रीय राज्‍यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्‍याशी नदी सुधार प्रकल्पाबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे. इंद्रायणी नदीबाबत पाठविलेल्‍या प्रस्‍तावाला मंजुरी मिळण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी त्‍यांच्‍याकडे केली. त्‍यांचा सकारात्‍मक प्रतिसाद आहे. हा प्रकल्प लवकरच सुरू करण्याचा मानस आहे.
- योगेश म्हसे, आयुक्त, पीएमआरडीए

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ali Khamenei: खामेनेई जिवंत? परराष्ट्रमंत्र्यांच्या दाव्याने जगभरात खळबळ; अजूनही पार्थिवावर अंत्यसंस्कार का झाले नाहीत?

Kannad Politics : कन्नडमध्ये काँग्रेसला मोठे खिंडार; डॉ. तृप्ती दिलीपसिंग राजपूत यांचा भाजपात प्रवेश

Finn Allen Century: १८ चेंडूंत ८८ धावा! फिन अ‍ॅलनचा T20 World Cup स्पर्धेत वर्ल्ड रेकॉर्ड; ख्रिस गेलचा विक्रम मोडलाच, शिवाय नोंदवले ५ मोठे पराक्रम, आफ्रिकेला बेक्कार झोडला...

Lakhandur News : चोरीचा गुन्हा उघडकीस आल्याने बदनामीच्या भीतीपोटी मुलीने संपविले जीवन

Murud Crime : मुरुड येथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; तिघांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT