पिंपरी-चिंचवड

नाट्यगृहात मराठी चित्रपट महोत्सवाचा समारोप

CD

पिंपरी, ता. २५ ः ‘मराठी चित्रपट संवर्धन आणि प्रदर्शनास चालना’ या संकल्पनेतून महापालिका आणि मराठी चित्रपट असोसिएशन यांच्यातर्फे ‘नाट्यगृहात चित्रपट’ संकल्पना राबविण्यात आली. त्याअंतर्गत चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित चित्रपटांना रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. महोत्सवाचा समारोप मंगळवारी झाला.
चिंचवड येथील रामकृष्ण मोरे नाट्यगृहात नवीन मराठी चित्रपट दाखवण्यात आले. यामध्ये ‘मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी’, ‘इलू इलू’, ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’, ‘चिकी चिकी बुबूमबूम’, ‘श्यामची आई’, ‘संगीत मानापमान’ अशा चित्रपटांचा समावेश होता.
असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील म्हणाले, ‘‘महोत्सवाला सात हजारांवर प्रेक्षकांनी भेट दिली. चित्रपटाचा दर फक्त ५० रुपये असल्यामुळे प्रेक्षकांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. प्रेक्षकांना फक्त चित्रपट पाहायचा आहे, तो पण माफक दरात त्यांच्या खिशाला परवडेल असा, असे महोत्सवातून दिसून आले.’’

‘‘मराठी चित्रपट मराठी प्रेक्षकांपर्यंत पोचवण्याचं हक्काचं स्थान म्हणजे नाट्यगृह ठरू शकतात, याची ही पावती आहे. मल्टिप्लेक्समध्ये मराठी चित्रपट लागत नाहीत. लागल्यास तिकीट दर अधिक असतात. ही संकल्पना भविष्यात मूर्त रूपात येऊ शकते.
- पद्मेश कुलकर्णी, प्रेक्षक, चिंचवड

‘‘कामावर जायचे असूनही मराठी चित्रपट पाहण्याच्या ओढीमुळे सकाळी साडेआठचा चित्रपट पाहण्यासाठी नाट्यगृहात आलो. चित्रपटाचा आनंद आमच्या वेळेनुसार व ५० रुपये तिकीट दरात बघायला मिळाल्याचे समाधान आहे.
- आर्या देशपांडे, प्रेक्षक, निगडी
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uri Encounter: अफगाणिस्तानवर हल्ल्यानंतर पाकड्यांचा मध्यरात्री उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न, भारतीय सैन्याने जाग्यावरच केलं ठार!

Ahmedabad Plane Crash : वैमानिकाच्या चुकीमुळे नाही तर 'या' मुळे घडली अहमदाबाद विमान दुर्घटना, अमेरिकेच्या तपास संस्थेचा दावा

Latest Marathi Live Update :नाशिकच्या येवल्यात एलपीजी गॅसची टंचाई; रिक्षाचालकांसह वाहनधारक अडचणीत

'मी कर्जाने घर घेतलं असतं आणि मेले असते तर...' उषा नाडकर्णी घराबद्दल बोलताना म्हणाल्या...

Iran War Ceasefire Talks : मोठी बातमी ! इराण युद्धबंदीच्या चर्चेसाठी तयार पण... डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितला नेमका अडथळा काय?

SCROLL FOR NEXT