पिंपरी-चिंचवड

गुन्हे वृत्त

CD

बनावट ॲपद्वारे ३३ लाखांना गंडा

पिंपरी : बनावट ॲप तयार करून त्याद्वारे शेअर मार्केट आणि आयपीओ खरेदी करण्यासाठी गुंतवणूक करण्यास सांगून एका व्यक्तीची ३३ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना बावधन येथे घडली.
या प्रकरणी ४१ वर्षीय व्यक्तीने बावधन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार जयंत पिरॅमल व एका एजंटवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी यांनी गुंतवणूक केली असता त्यांना त्याचा परतावा अथवा गुंतवलेली रक्कम परत न देता त्यांची ३३ लाख ४० हजार ८८५ रुपयांची फसवणूक केली.


भाडेकरूची फसवणूक
पिंपरी : फ्लॅटसाठी दिलेली अनामत रक्कम परत न देता भाडेकरूची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना बाणेर येथे घडली. या प्रकरणी बाणेर येथील ५१ वर्षीय व्यक्तीने बावधन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका महिलेसह दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी यांनी आरोपींचा फ्लॅट भाड्याने घेतला होता. त्यावेळी फिर्यादी यांनी आरोपींना एक लाख ३५ हजार रुपये अनामत रक्कम दिली होती. फिर्यादी यांनी फ्लॅट सोडण्यापूर्वी महिला आरोपीला माहिती दिली. तरी देखील त्यांनी रक्कम परत न देता फसवणूक केली.

अल्पवयीन मुलाकडून पिस्तुल जप्त
पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी व औद्योगिक तक्रार निवारण पथकाने एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेत त्याच्याकडून एक पिस्तुल आणि एक जिवंत काडतूस जप्त केले. ही कारवाई मोशीतील संतनगर येथे करण्यात आली. संतनगर, मोशी येथे एक अल्पवयीन मुलगा पिस्तुल घेऊन आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून मुलाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पन्नास हजार पाचशे रुपये किंमतीचे एक पिस्तुल आणि एक जिवंत काडतूस जप्त केले. त्याने हे पिस्तुल दीपक वाघमारे याच्याकडून आणले होते. त्यामुळे दीपक वाघमारे (रा. मोशी) याच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलासह कुटुंब संपवेन! व्हिडीओ कॉलवर कपडे काढायला लावले; ४३ वर्षीय महिलेचा VIDEO केला व्हायरल; २३ ते २८ वर्षांच्या तिघांना अटक

Pune Crime : कारागृहातूनही आंदेकर टोळी सक्रिय; पुणे पोलिस आयुक्तांचे कारागृह प्रशासनाला कडक निर्बंधांचे पत्र

America-Pakistan Relations: 'शांतिदूत' बनलेल्या पाकिस्तानला अमेरिकेचा दणका; ट्रम्प यांचा 'तो' प्रस्ताव ऐकून शहबाज यांना शब्द फुटेना

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT