पिंपरी, ता. ७ ः औद्योगिक क्रीडा संघटना आणि अल्ट्रा कॉप्रोटेक प्रा.लि.तर्फे ताथवडे येथे आयोजित ६१ व्या औद्योगिक बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरी गटात यशवंत राजू (टाटा मोटर्स) याने तर महिला एकेरीत साद धर्माधिकारीने (अल्ट्रा कॉर्पोटेक) मंगळवारी (ता.७) विजेतेपद पटकाविले. प्रौढ एकेरी गटात केदार टांकसाळे(टीकेआयएल) यांनी अजिंक्यपद प्राप्त केले.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण अल्ट्रा कॉर्पोटेक प्रा. लि.चे कार्यकारी संचालक (व्यवसाय विकास) दीपक शेट्टी, मनुष्यबळ विकास प्रमुख (कॉर्पोरेट) राहुल बगळे, अमित काळे, औद्योगिक क्रीडा संघटनेचे उपाध्यक्ष नरेंद्र कदम, सचिव वसंत ठोंबरे, स्पर्धा प्रमुख हरी देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेसाठी धीरज अधिकारी, प्रतीक गोखले, आशिष भोसले, प्रशांत गागरे, मुख्य पंच परबत कुंभार, अजित कुंभार यांचे सहकार्य लाभले. संघटनेचे खजिनदार प्रदीप वाघ यांनी आभार मानले. वसंत ठोंबरे यांनी प्रास्ताविक केले. धीरज अधिकारी यांनी सूत्रसंचालन केले.
पुरुष एकेरी गटाच्या अंतिम फेरीत यशवंत राजू (टाटा मोटर्स) याने शंतनू डोकेला (कोफोर्ज) १५ - ८, १५ - १३ असे पराभूत करत विजेतेपदावर नाव कोरले. तर महिला एकेरीमध्ये साद धर्माधिकारीने (अल्ट्रा कॉर्पोटेक) अदिती काळेला (टीसीएस) १५ - ६, १५ - ९ असे हरविले. प्रौढ एकेरी गटात केदार टांकसाळे (टीकेआयएल) यांनी राहुल सोनी यांचा (भारतीय हवाई दल) १७ - १५, १५-४ असा पराभव केला.
अन्य गटांतील अंतिम फेरीचे निकाल पुढील प्रमाणे -
पुरुष दुहेरी : यशवंत राजू, योगेश गुंजाळ (टाटा मोटर्स) वि.वि. ओंकार वाजगे, आर. प्रभाकरन (फ्लिटगार्ड फिल्टर्स) १५-७, १५-१२. महिला दुहेरी : अदिती काळे, ऋतुजा तायडे (टीसीएस) वि.वि. निशिता रॉय, मधुमिता समद (बजाज ऑटो, आकुर्डी) १५-८, १५-५. मिश्र दुहेरी : अदिती काळे, आनंद सोमण (टीसीएस) वि.वि. संकेत डांगे, साद धर्माधिकारी (अल्ट्रा कॉर्पोटेक) १६-१४, १५-८. प्रौढ दुहेरी : केदार टांकसाळे, वीरेंद्र कुलकर्णी (टीकेआयएल) वि.वि. ललित पांडे, विनीत रतनपुरा (बजाज ऑटो, आकुर्डी) १५-१२, १५-१३.
PNE25U78846
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.