पिंपरी-चिंचवड

हिंजवडीतील कोंडीवर नवीन रस्त्यांचा उपाय आमदार जगताप यांची ‘पीएमआरडीए’ आयुक्‍तांशी चर्चा

CD

पिंपरी, ता. १८ : वाकड, हिंजवडी, पुनावळे, ताथवडे, माण, म्हाळुंगे या भागात सातत्याने वाहतूक कोंडीचा प्रश्‍न आहे. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी पीएमआरडीएच्या विकास आराखड्यात बदल करून, काही नवीन रस्त्यांचे नियोजन करण्याचा तसेच आवश्यक ठिकाणी पूल बांधून वाहतुकीचेही नव्याने नियोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती आमदार शंकर जगताप यांनी दिली.
आमदार जगताप यांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) कार्यालयात आयुक्‍त योगेश म्‍हसे यांच्‍या उपस्‍थितीत बैठक घेतली. यामध्ये वाहतूक कोंडीवरील उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली. पीएमआरडीए कार्यालयात झालेल्या या बैठकीस मुख्य अभियंता (अभियांत्रिकी-१) अशोक भालकर, सहआयुक्त हिम्मत खराडे, उपसंचालक व महा नियोजनकार श्वेता पाटील, मुख्य अभियंता (अभियांत्रिकी- २) रिनाज पठाण आदींसह अधिकारी उपस्‍थित होते.

या बैठकीत शेतकऱ्यांच्या जमिनींचा परतावा, पीएमआरडीएने संपादित केलेल्या जमिनींच्या मोबदल्याबाबत, शेतकऱ्यांना राखीव भूखंडाविषयी सविस्तर माहिती देण्यासाठी कार्यपद्धती, वाकड येथे क्रीडांगण विकसित करणे, मेट्रो स्थानकांच्या नामांतराबाबत चर्चा करण्यात आली.

फोटोः 81824

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

Pune Traffic: पुणेकर झाले पोलिस! ४० लाख नागरिकांनी कमावून दिले १२ कोटी; ‘पीटीपी’ला राष्ट्रीय पुरस्कार

Pune Fraud News : बांधकाम व्यावसायिक महिलेची पावणेसहा कोटींची फसवणूक; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT