पिंपरी, ता. १८ ः रुपीनगर परिसरात काही रोडरोमिओ बुलेटच्या सायलेन्सरमध्ये बदल करून ठो.. ठो.. फट.. असा मोठा भीतीदायक आवाज करून परिसरातील सार्वजनिक शांततेचा भंग करत आहेत. या आवाजाने लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग पुरता त्रस्त झाला असूनही पोलिस अशा टोळक्यांवर कारवाई करताना दिसत नाहीत.
दररोजच्या कामात व्यस्त असणारे नागरिक, उद्योजक, परिसरातील शाळांतील विद्यार्थी, दवाखान्यांतील रुग्ण या सर्वांना ‘बुलेट राजां’च्या दुचाकीचा त्रास होत आहे. सामाजिक कार्यकर्ते, पुढारी, पोलिस यंत्रणेने अशा बुलेट राजांवर कोणाचा वरदहस्त आहे ? याची सखोल चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करण्यासाठी पुढाकार घ्यावा. परिसरातील सार्वजनिक शांतता अबाधित ठेवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
व्यावसायिक माणिकलाल वर्मा म्हणाले,‘‘मी रूपीनगर भागात अनेक वर्षांपासून व्यवसाय करतो. अचानक बुलेट घेऊन येणारे रोडरोमिओ यांचा आम्हाला त्रास होत आहे. कोणाशी उगाच वाद नको, यासाठी शांत राहून हा त्रास सहन करत आहोत.’’
गृहिणी निर्मल जाधव म्हणाल्या, ‘‘रस्त्यावरून जाताना सकाळी अनेकदा हे बुलेटस्वार मोठा आवाज करत येतात. त्यामुळे भीती वाटते. सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्यांवर कारवाई करावी.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.