पिंपरी-चिंचवड

ई बसच्या खरेदीसाठी पालिकेकडून सात कोटी वर्ग

CD

पिंपरी, ता. १८ : पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल) यांच्यासाठी पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका मिळून ३५० ई-बसगाड्या खरेदी करण्याचा निर्णय झाला होता. त्यापैकी १४० ई-बस खरेदीसाठी पिंपरी-चिंचवड महापालिका खर्च देणार आहे. त्यापैकी १४ बससाठी सात कोटी रुपयांचा खर्च महामंडळास वर्ग करण्यात आला आहे.
केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम अंतर्गत शहरातील हवा शुद्ध करण्यासाठी १७२.९७ कोटींचा आराखडा मंजूर झाला आहे. याध्ये पिंपरी- चिंचवड व पुणे महापालिकेमार्फत पीएमपीला १०० ई-व्ही आणि १०० सीएनजी बस खरेदी करण्याचे नियोजन आहे. त्या खरेदीसाठी ६० टक्के पुणे व ४० टक्के खर्च पिंपरी महापालिकेकडून केला जाणार आहे. त्यानुसार २०२३-२४ मधील अंदाजपत्रकात एकूण ३५० ई-बसपैकी १४० ई-बससाठी खर्च देण्याचे पिंपरी पालिकेने निश्चित केले होते.

या खरेदीसाठी प्रतिबस ५० लाख रुपयांप्रमाणे सुमारे ७० कोटी रुपये महापालिकेकडून अदा केले जात आहेत. त्यापैकी १४ बससाठी आवश्यक ७ कोटी रुपयांचा निधी पीएमपीला देण्यास प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT