पिंपरी, ता. २३ ः पावसाळ्याच्या पार्शभूमीवर शहरातील आपत्कालीन व्यवस्थापनाचा आढावा विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी शुक्रवारी महापालिका भवनात घेतला. त्यानंतर विविध ठिकाणी भेट देऊन संभाव्य पूरस्थितीची पाहणी केली. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी समन्वयाने जबाबदारी पार पाडावी, असा आदेशही त्यांनी दिला.
महापालिका आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त पोलिस आयुक्त एस. डी. आव्हाड, उपआयुक्त बापू बांगर, निवासी उपजिल्हाधिकारी नामदेव टिळेकर, तहसीलदार जयराज देशमुख, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, सहआयुक्त चंद्रकांत इंदलकर, सहशहर अभियंता बापू गायकवाड, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे, जलसंपदा विभागाचे अनिकेत हसबनीस, किशोर चव्हाण, माणिक शिंदे, पुणे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डूबल आदी उपस्थित होते. आपत्ती व्यवस्थापन सादरीकरण मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल यांनी केले. आपत्कालीन परिस्थिती निवारण्यासाठी पोलिस नियंत्रण कक्ष सज्ज असून, वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रभावी उपाययोजना केल्याचे अतिरिक्त पोलिस आयुक्त एम. डी. आव्हाड यांनी सांगितले.
शहरातील पूर क्षेत्राचा महापालिकेने आराखडा तयार केला असून सुरक्षा पथक तैनात आहेत. नालेसफाईचे काम अंतिम टप्प्यात आहे. पुरस्थिती उद्भवल्यास नागरिकांचे स्थलांतराचे नियोजन केले आहे. आपत्कालीन संपर्क क्रमांक प्रसिद्ध केले आहेत. २४ तास नियंत्रण कक्ष कार्यरत आहे.
- शेखर सिंह, आयुक्त, महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.