पिंपरी-चिंचवड

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण ---------------------------- सात दिवसांनंतर सासरा, दीर जेरबंद पाच दिवसांची पोलिस कोठडी; पुणे अन् सातारा जिल्ह्यात फिरत असल्याचे उघड

CD

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण
----------------------------
सात दिवसांनंतर सासरा, दीर जेरबंद

पाच दिवसांची पोलिस कोठडी; पुणे अन् सातारा जिल्ह्यात फिरत असल्याचे उघड

पिंपरी, ता. २३ : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील फरारी आरोपी सासरा राजेंद्र हगवणे व दीर सुशील हगवणे यांना अखेर बावधन पोलिसांनी सात दिवसांनी पुण्यातील स्वारगेट येथून शुक्रवारी (ता. २३) पहाटे साडेचारच्या सुमारास अटक केली. सात दिवसांपासून हे आरोपी पुणे जिल्ह्यासह सातारा परिसरातच वेगवेगळ्या भागात राजरोसपणे फिरत होते.
सासरा राजेंद्र तुकाराम हगवणे (वय ५७), दीर सुशील राजेंद्र हगवणे (वय २७) अशी अटक आरोपींची नावे आहेत. जमीन खरेदी करण्यासाठी दोन कोटी रुपये माहेराहून आणावेत, यासाठी सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या छळाला कंटाळून वैष्णवी शशांक हगवणे (वय २३, रा. मुक्ताई गार्डनजवळ, भुकूम, ता. मुळशी) या विवाहितेने १६ मे रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी बावधन पोलिसांनी वैष्णवी यांचा पती शशांक, सासू लता, नणंद करिष्मा यांना अटक केली. सध्या ते २६ मेपर्यंत पोलिस कोठडीत आहेत.
आरोपी सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हे पिता-पुत्र गेले सात दिवस पोलिसांना गुंगारा देत होते. जिल्ह्यातच तळेगाव, वडगाव-मावळ, आळंदी तसेच सातारा जिल्ह्यात ते फिरत होते. अखेर शुक्रवारी पहाटे हे दोघे पुण्यात स्वारगेट परिसरात बावधन पोलिसांच्या हाती लागले.

मदत करणाऱ्यांनाच घेतले ताब्यात
आरोपी मिळत नसल्याने पोलिसांनी अधिक वेगाने तपासाला सुरुवात केली. आरोपींचे नातेवाईक, मित्र तसेच त्यांच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपींना मदत करणाऱ्यांनाच पोलिसांनी ताब्यात घेतल्याने अखेर आरोपींचे सर्वच मार्ग बंद झाले.

कुटुंबातील पाचही जण तुरुंगात
या प्रकरणात पोलिसांनी सुरुवातीला वैष्णवीचा पती शशांक, सासू लता व नणंद करिष्मा यांना अटक केली असून त्यांना २६ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर आता वैष्णवीचा सासरा व दीर यांनाही बेड्या ठोकल्या आहेत. त्यामुळे कुटुंबातील पाचही जण आता तुरुंगाची हवा खाणार आहेत.

अन् सूत्रे हलली
वैष्णवी आत्महत्या प्रकरणात शनिवारी (ता. १७) गुन्हा दाखल झाला. सुरुवातीला वैष्णवीचा पती, सासू व नणंद यांना अटक केली. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी पदाधिकारी असलेला सासरा राजेंद्र हगवणे व दीर हे फरारीच होते. या कालावधीत ते सुरुवातीचे काही दिवस पुणे परिसरातच फिरत असल्याचे समोर आले. सहा दिवस उलटूनही ते पोलिसांच्या हाती लागत नव्हते. याबाबत विविध स्तरातून संताप व्यक्त झाला. दरम्यान, गुरुवारी (ता. २२) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या प्रकरणाची गंभीर दाखल घेतली. फरारी आरोपींना तत्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी पोलिस आयुक्तांना दिल्या. त्यानंतर वेगाने सूत्रे हलली. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी पाच पथके रवाना करण्यात आली. अखेर या आरोपींना पुण्यातील स्वारगेट येथून पोलिसांनी अटक केली.

उशिरा अटकेबद्दल अनेक प्रश्न
आरोपींच्या अटकेवरही अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. इतकी गंभीर घटना असताना तसेच आरोपी पिंपरी-चिंचवड व पुणे परिसरातच फिरत असतानाही ते पोलिसांच्या हाती कसे लागले नाहीत. प्रसार माध्यमे तसेच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी गंभीर दाखल घेतल्यानंतर पोलिसांना जाग आली का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

वैष्णवीला पाईपने मारहाण झाल्याचे समोर
वैष्णवी यांना त्यांचा आरोपी पती शशांक याने पाईपने मारहाण केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. दरम्यान, वैष्णवी यांना मारहाण केलेला पाइप तसेच वैष्णवी यांना लग्नात हुंडा म्हणून दिलेली दुचाकी, फार्च्युनर ही वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

एफ-२ वाघिणीचा ‘फॅमिली टाइम’; चार बछड्यांनी वेधलं वन्यजीवप्रेमींचे लक्ष, पाहा VIDEO

Video:'जेसीबी'च्या सहाय्याने शाळकरी मुलांना केलं रेस्क्यू; नागपूरमध्ये पावसाचा हाहाःकार, व्हिडीओ व्हायरल

Pune FDA Action: पुण्यात एफडीएची मोठी धाड: मध्‍यवस्‍तीतील मिठाई, कँडी व चॉकलेटचा ५५ लाखांचा निकृष्ट साठा जप्त

Pune Hinjewadi Metro: हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रो पहिल्या टप्प्यासाठी सज्ज; सीएमआरएस मंजुरीनंतर उद्‌घाटनाच्या मुहूर्ताकडे पुणेकरांचे लक्ष

Pune Illegal Construction: पुणे महापालिकेची बेकायदा बांधकामांवर धडक कारवाई; लोहगाव-खराडीतील २१,४०० चौरस फूट आरसीसी इमारत जमीनदोस्त

SCROLL FOR NEXT