पिंपरी-चिंचवड

धनादेश न वटल्याप्रकरणी माजी पोलिस अधिकाऱ्याला कारावास

CD

पिंपरी, ता. २५ : पैशांची परतफेड करण्यासाठी दिलेला धनादेश न वटल्याप्रकरणी सेवानिवृत्त पोलिस अधिकाऱ्याला तीन महिने कैद आणि ३ लाख २६ हजार रुपये भरपाई देण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायालयाने दिले आहेत.
प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. एम. गायकवाड यांनी हे आदेश दिले.
फिर्यादी गणेश रवींद्र धुमाळ यांची आरोपी गिरीश कृष्णाजी बोर्डे यांच्या वडिलांशी ओळख होती. आरोपीच्या वडिलांनी गणेश यांना फोन करून मुलगा गिरीश हा अडचणीत असल्याने त्याला पैशांची मदत करण्याचे सांगितले. आरोपी गिरीश पोलिस खात्यात नोकरीला असून सोसायटीचे कर्ज काढले आहे. कर्जाच्या परतफेडीसाठी २५ एप्रिल २०२२ रोजी प्रथम १ लाख ५० हजार रूपये व नंतर ६ हजार, ४ हजार असे एकूण १ लाख ६० हजार रूपये दिले. आरोपीने फिर्यादीला ९ जून २०२२ रोजी धनादेश दिला. फिर्यादीने तो १३ जून २०२२ रोजी बॅंकेत भरला असता आरोपीच्या खात्यामध्ये पुरेशी रक्कम नसल्यामुळे परत आला. त्यानंतर १२ ऑगस्ट २०२२ रोजी धनादेश न वटल्याबाबत तक्रार दाखल केली. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर कोर्टाने ३ मार्च २०२५ रोजी निकाल दिला. त्यानुसार आरोपीस दोषी धरून तीन महिन्यांची साधी कैद व ३ लाख २६ हजार रूपये नुकसान भरपाई आणि ती रक्कम न भरल्यास एक महिना साधा कारावास, शिवाय फिर्यादीस खर्चापोटी पाच हजार रुपये देण्याचे आदेश दिले. ही रक्कम न दिल्यास ८ दिवसांचा पुन्हा कारावास भोगावा लागणार आहे. या प्रकरणी फिर्यादीतर्फे ॲड. कुंडलिक गावडे व ॲड. चंद्रकांत माने यांनी काम पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलासह कुटुंब संपवेन! व्हिडीओ कॉलवर कपडे काढायला लावले; ४३ वर्षीय महिलेचा VIDEO केला व्हायरल; २३ ते २८ वर्षांच्या तिघांना अटक

Pune Crime : कारागृहातूनही आंदेकर टोळी सक्रिय; पुणे पोलिस आयुक्तांचे कारागृह प्रशासनाला कडक निर्बंधांचे पत्र

America-Pakistan Relations: 'शांतिदूत' बनलेल्या पाकिस्तानला अमेरिकेचा दणका; ट्रम्प यांचा 'तो' प्रस्ताव ऐकून शहबाज यांना शब्द फुटेना

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT