पिंपरी, ता. २४ : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात कलम वाढ करून नीलेश रामचंद्र चव्हाण (वय ३५, रा. कर्वेनगर, पुणे) याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैष्णवी यांच्या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे. नीलेश चव्हाण हा फरार असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
सासरकडील मंडळींच्या छळाला कंटाळून वैष्णवी शशांक हगवणे यांनी १६ मे रोजी भुकूम येथे राहत्या घरी आत्महत्या केली. या प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत असलेल्या बावधन पोलिस ठाण्यात शनिवारी (ता. १७) गुन्हा दाखल करण्यात आला. भारतीय न्याय संहिता कलम ८० (२), १०८, ११५ (२), ३५२, ३५१ (२), ११८ (१), ३ (५) प्रमाणे बावधन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हुंडाबळी आणि मृत्यूस कारणीभूत ठरणे असा गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, वैष्णवी यांच्या मृत्यूनंतर त्यांचे दहा महिन्यांचे बाळ चव्हाण याच्याकडे असल्याचे समोर आले. त्यानंतर वैष्णवीचे बाळ कस्पटे कुटुंबीयांकडे सुपूर्द केले. मात्र, चव्हाण याच्याकडे हे बाळ असताना बाळाची हेळसांड झाल्याचे समोर असल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त सुनील कुराडे यांनी दिली.
मोटारी, पिस्तुले जप्त
वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्येनंतर त्यांचा सासरा राजेंद्र हगवणे व दीर सुशील हगवणे हे सात दिवस फरार होते. या कालावधीत त्यांनी थार व इंडेव्हर या आलिशान मोटारींनी ठिकठिकाणी प्रवास केला. त्या दोन्ही मोटारी पोलिसांनी जप्त केल्या. तसेच आरोपी शशांक व सुशील यांच्या नावे परवाना असलेली दोन पिस्तुलेही बावधन पोलिसांनी जप्त केली. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी शनिवारी दिवसभर आरोपींकडे कसून चौकशी केली. पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी बावधन पोलिस ठाण्यात जाऊन तपासाचा आढावा घेतला. तसेच अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.