पिंपरी-चिंचवड

धनादेश न वटल्याप्रकरणी डॉक्टरला १८ लाखांचा दंड

CD

पिंपरी, ता. २४ : जेनेरिक औषधांसाठी दिलेला १५ लाख रूपयांचा धनादेश न वटल्याप्रकरणी आरोपी डॉक्टरला १८ लाख रूपयांची नुकसान भरपाई देण्याची शिक्षा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी बी. डी. चोखट यांनी नुकतीच ठोठावली.
तळवडे येथे हॉस्पिटलसाठी जागा भाड्याने घेऊन त्यामध्ये जेनेरिक औषधांचे गाळे बनविणार असून ते फिर्यादी स्वप्नील पोपट भालेराव यांना देण्याचे आश्वासन डॉ. महेश रघुनाथ काकडे यांनी दिले होते. त्यानुसार करारनामा करून फिर्यादीकडून आरोपीने १५ लाख रूपये घेतले. मात्र पुढे आरोपीने नियोजित हॉस्पिटलच्या जागेत फिर्यादीस गाळा दिला नाही. पाठपुराव्यानंतर आरोपीने दिलेला धनादेश बॅंकेत वटला नाही. त्यामुळे फिर्यादी यांनी २८ एप्रिल २०२३ रोजी आरोपी विरोधात पिंपरी न्यायालयात खटला दाखल केला. न्यायालयाने आरोपी डॉक्टर डॉ.काकडे यांना १८ लाखांचा दंड ठोठावला. तसेच ही रक्कम न भरल्यास दोन महिन्यांची कैद सुनावली. या प्रकरणी फिर्यादीतर्फे ॲड. कुंडलीक गावडे व ॲड. चंद्रकांत माने यांनी काम पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Squad for ICC Women’s T20 World Cup 2026 : वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; सलामीला पाकिस्तानशी भिडणार, जाणून घ्या खेळाडूंची यादी अन् संपूर्ण वेळापत्रक

Kanker IED Blast: छत्तीसगडमध्ये मोठा आयईडी स्फोट! ३ जवान शहीद तर १ जखमी, कशी घडली घटना?

भारताच्या प्रगतीचं पाककडून कौतुक! भारत खूप पुढे गेलाय आम्ही मागे आहोत...पाकिस्तानी मंत्र्यांची स्पष्ट कबुली

मुंबईकरांसाठी दिलासा! ११ किमीचा सिग्नल-फ्री कॉरिडोर तयार; ट्रॅफिकमधून सुटका होणार, मार्ग कुठून कुठे असणार?

Latest Marathi News Live Update : तुळजापूरमध्ये चालकाला बेदम मारहाण; २८ हजारांची लूट

SCROLL FOR NEXT