पिंपरी-चिंचवड

गुन्हे वृत्त

CD

रिवॉर्ड पॉइंटच्या बहाण्याने ६५ हजारांना गंडा
पिंपरी : क्रेडिट कार्डवरील रिवॉर्ड पॉईंटच्या नावाखाली एका तरुणाची ६५ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. ही घटना पिंपळे सौदागर परिसरात घडली. या प्रकरणी पिंपळे सौदागर येथील ३७ वर्षीय तरुणाने सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी यांना एका मोबाईल क्रमांकावरून फोन आला. आरोपीने तो अ‍ॅक्सिस बँकेतून बोलत असल्याचे सांगून एका महिलेने रिवॉर्ड पॉईंटसच्या माध्यमातून सूट देण्याची बतावणी केली. नंतर एक लिंक पाठवून ६५ हजार रुपयांची फसवणूक केली.

साहित्याच्या चोरीप्रकरणी कामगारावर गुन्हा
पिंपरी : कंपनीतील साहित्य चोरल्याप्रकरणी कामगारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना तळवडे येथील कार्बन कंपनीत घडली. मोहसीन अत्तार (रा. विकासनगर, किवळे, ता. हवेली, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी सुरिंदरपालसिंग चरणजितसिंग गुलाटी (रा. बालमोराल इस्टेट, बाणेर, पुणे) यांनी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपीने कंपनीतील कॉपर व टंगस्टन कार्बाईड असे एकूण ७४ हजार ७११ रुपयांचे साहित्य चोरून नेले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : चार सामने अन् Orange Cap साठी ७ दावेदार! विराटचा शेवटचा क्रमांक, Vaibhav Sooryavanshi पण आहे पुढे, टॉपर कोण?

डोळ्यात संताप अन् लेकरासाठीची तगमग; प्रार्थना बेहेरेच्या 'मर्दिनी'चा टीझर प्रदर्शित; दिसणार अभिनेत्रीचा दमदार अंदाज

कला, नृत्य आणि विज्ञानाचा संगम... मुंबईत ओपन सायन्स पार्क साकारतंय! विज्ञान शिकणं होणार आणखी रंजक

Mhada Lottery: काही दिवस बाकी! म्हाडाच्या २,६४० घरांची लॉटरी, लगेचच करा अर्ज; कुठे आणि कसा? जाणून घ्या...

Nautapa 2026: नवतापा म्हणजे काय? वर्षातील सर्वात गरम दिवसांमागचं धार्मिक आणि वैज्ञानिक कारण जाणून घ्या

SCROLL FOR NEXT