पिंपरी, ता. २५ : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र ब्राह्मण सभेतर्फे विशेष अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सावरकरांच्या विचारांचा गौरव करत तज्ज्ञांनी सावरकरांच्या कार्यावर प्रकाश टाकला. यावेळी कुंदनकुमार साठे यांना ‘वीर सावरकर पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. तसेच हुतात्मा उत्तम भिकले यांच्या वीरपत्नी सुगंधा भिकले यांचा सन्मान करण्यात आला.
स्वा. सावरकरांनी लिहिलेली छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती कुणाल टिळक, संदीप खर्डेकर, कर्नल पद्मनाभन जोशी, मंदार परळीकर, सुगंधा भिकले व कुंदनकुमार साठे यांच्या हस्ते यावेळी करण्यात आली. परळीकर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्यावर प्रभावी भाषण केले. या कार्यक्रमात पदनियुक्त्यांची घोषणाही करण्यात आली. यात मयुरेश अरगडे- महाराष्ट्र ब्राह्मण सभा कार्याध्यक्ष, विद्या घटवाई- महिला आघाडी अध्यक्ष, तुषार निंबरगी-पुणे जिल्हाध्यक्ष, राहुल अवटी यांची संघटन सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली. पसायदानाने कार्यक्रमाचा समारोप झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.