पिंपरी-चिंचवड

पिंपरी गावातील सिमेंट रस्ता अखेर खुला

CD

सकाळ इम्पॅक्ट

पिंपरी, ता. २५ ः पिंपरी कॅम्प बाजारपेठेशी जोडणारा पिंपरी गावातील मुख्य रस्ता नुकताच खुला करण्यात आला. त्यामुळे रहाटणी, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, वाकड आदी भागांतील नागरिकांना खरेदीसाठी बाजारपेठेत ये-जा करणे सोयीचे झाले आहे; तर पिंपरी गावातून हिंजवडी आयटी पार्क येथे किंवा पुण्यात जाणाऱ्या नागरिकांसाठी या रस्त्याचा उत्तम पर्याय उपलब्ध झाला आहे. याशिवाय एकेरी वाहतुकीमुळे पिंपरी गाव आणि पिंपळे सौदागर या दोन्ही भागांत होणारी कोंडी कमी होण्यास मदत झाली आहे.
पिंपरी गावात म्हाडाकडून बहुमजली गृहसंकुल उभारण्यात आले आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी त्याच्या समोरील मुख्य रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते. काही तांत्रिक अडचणी आणि सेवा वाहिन्यांचे स्थलांतरामुळे रस्त्याचे काम पूर्ण होण्यास तब्बल दोन वर्षांचा वेळ लागला. या विलंबाबाबत ‘सकाळ’ने महिनाभरापूर्वी वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यावर रस्त्याचे काम महिनाभरात पूर्ण करुन तो वाहतुकीसाठी खुला करण्याचे आश्वासन पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यकारी अभियंता नितीन निंबाळकर यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिले होते. त्यावर महिनाभरात काम पूर्ण करुन रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

वाहतूक कोंडीचा त्रास कमी
पिंपळे सौदागर येथून पिंपरी गावात जाणाऱ्या वाहनांची या रस्त्यावर मोठी वर्दळ असते. पिंपरी कॅम्प या मुख्य बाजारपेठेत खरेदीसाठी जाणाऱ्या नागरिकांना याच रस्त्याने जावे लागते. तसेच कॅम्पातून बाहेर पडण्यासाठी देखील याच रस्त्याचा उपयोग करावा लागतो. पिंपरी आणि पिंपळे सौदागर या दोन्ही बाजूंनी येणाऱ्या वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे सकाळी आणि सायंकाळी येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. त्याचा आजूबाजूच्या रहिवाशांना त्रास होत होता. ‘सकाळ’च्या पाठपुराव्याने रस्त्याचे शंभर टक्के काम पूर्ण होऊन रस्ता खुला झाला. त्यामुळे पिंपरी कॅम्प बाजारपेठेत येण्या-जाण्याची नागरिकांची सोय झाली आहे. तर पिंपरी मार्गे हिंजवडी आयटी पार्क तसेच पुण्यात जाणा-या नागरिकांसाठी देखील पर्यायी रस्ता उपलब्ध झाला आहे.

ग्राहकांसाठी उत्तम पर्याय
पिंपरी कॅम्प या मुख्य बाजारपेठेतून बाहेर पडून पुणे - मुंबई महामार्गावर जलद गतीने जाण्यासाठी साई चौकातील रेल्वे पुलाखालून जावे लागते. परंतु, या मार्गावर वाहनांची वर्दळ असल्याने येथे वाहतूक कोंडी होते. साई चौकातून पुढे मार्ग काढणे वाहनचालकांना शक्य होत नाही. भाटनगरमार्गे राजीव गांधी उड्डाण पुलावरून मोरवाडी चौकात जाण्यासाठी सायंकाळी किमान एक ते दीड तास वेळ लागतो. अशा वेळी पिंपरी डेअरी फार्म रस्त्याने वळसा घालून सहज जाणे शक्य आहे. पण, सध्या या मार्गावर पिंपरी डेअरी फार्म उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यासाठी रस्ता अडवण्यात आला आहे. पुलाचे काम पूर्ण होण्यास किमान सात ते आठ महिन्यांचा अवधी अपेक्षित आहे. त्यामुळे वाहनचालकांना म्हाडा गृह प्रकल्पसमोरील मुख्य रस्त्याने पिंपळे सौदागर मार्गे पिंपळे गुरव, भारतरत्न जे. आर. डी. टाटा उड्डाणपुलावरून पुणे-मुंबई महामार्गावर उतरावे लागते. पिंपरी डेअरी फार्म रस्ता बंद असल्यामुळे वाहन चालकांना पिंपरी गावातील सिमेंट रस्त्याने जाण्याचा एकमेव पर्याय सध्या उपलब्ध झाला आहे.


असा झाला रस्ता...
- फेब्रुवारी २०२३ ः ठेकेदाराला कामाचे आदेश
- २४ महिने ः कामाची मुदत
- फेब्रुवारी २०२५ ः मुदत संपुष्टात
- रक्कम १३ कोटी ः कामाची रक्कम
- ३ महिने ः काम पूर्ण करण्यास मुदतवाढ
- १ महिना ः काम पूर्ण करण्याचे अधिकाऱ्याचे आश्वासन

रस्त्याचे काम पूर्ण करुन दोन्ही मार्गांनी वाहतूक सुरू केली आहे. आता रस्त्याच्या कडेवरील किरकोळ कामे सुरू आहेत. ही कामे मार्गी लावण्यासाठी तीन महिन्यांची मुदतवाढ घेतली आहे. सर्व कामे वेळेत पूर्ण करुन रस्ता सुसज्ज आणि गतिमान केला जाणार आहे. नवमहाराष्ट्र विद्यालयाच्या कोपऱ्यापर्यंत हा रस्ता विकसित केला जाईल.

- नितीन निंबाळकर, कार्यकारी अभियंता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

Dubai Call Center Scam: वाघोलीतील उद्योजकाची ७० लाख ८५ हजारांची फसवणूक; दुबई कॉल सेंटर रॅकेट उघड, गुजरातच्या टोळीवर गुन्हा

BJP Ideology Camp: भाजप-आरएसएस प्रशिक्षण शिबिरात नगरसेवकांना वैचारिक धडा; ध्येयधोरणांपासून भटकू नका, कान टोचले

Crude Oil Crisis: इंधन दरवाढीविरोधात उद्या राज्यभर आंदोलन! तुमच्या शहरात पेट्रोलचे भाव किती?

SCROLL FOR NEXT