पिंपरी-चिंचवड

शहरात अधिकृत रिक्षा थांबे वाढणार

CD

पिंपरी, ता. २५ : पिंपरी-चिंचवड शहरात तब्बल पंधरा वर्षांनी रिक्षा थांब्यांचे सर्व्हेक्षण करण्यात आले. त्यानंतर नवीन ४६ रिक्षा थांब्यांची भर पडण्याची शक्यता आहे. याला ‘आरटीए’ अर्थात प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाची अंतिम मान्यता मिळण्याची प्रतीक्षा आहे. त्यानंतर शहरातील अधिकृत रिक्षा थांब्याची संख्या १२३ वर जाण्याची चिन्हे आहेत.

प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ), वाहतूक शाखा, महापालिकेचे प्रतिनिधी, रिक्षा संघटनेचे प्रतिनिधी, प्रवासी संघटनेचे प्रतिनिधी यांनी थांब्याचे सर्व्हेक्षण केले आहे. पिंपरी-चिंचवड आरटीओ कार्यालयात दि. ५ मेपर्यंत ४४ हजार ७९४ रिक्षांची नोंद झाली आहे. शहरातील मोक्याच्या ठिकाणी, मुख्य चौक, एसटी स्टॅण्ड, रेल्वे स्थानके, मेट्रो स्थानकांबाहेर अनधिकृत रिक्षा थांबे उभारले आहेत. तेथेही बेशिस्त असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. याबाबत ९ मे रोजी सकाळमध्ये ‘अनधिकृत रिक्षा स्टॅण्डचे फुटले पेव’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करण्यात आले.
पिंपरी चिंचवड शहरातील रिक्षा थांब्याची जागा निश्चित करण्यासाठी शेवटचा सर्व्हे २०१०-११ मध्ये झाला होता. यावेळी शहरात केवळ ७७ रिक्षा थांब्यांना परवानगी दिली होती. त्यानंतर गेल्या पंधरा वर्षांत शहरातील रिक्षा थांब्यांचा सर्व्हेच झाला नव्हता. जिल्हाधिकाऱ्यांनी मागील वर्षी ‘आरटीओ’ला रिक्षा थांब्याचे सर्व्हेक्षण करण्याचे आदेश दिले. ‘आरटीओ’कडून ऑगस्ट २०२४ मध्ये रिक्षा थांब्यांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले होते. पण, निवडणुका, दिवाळी आदी कारणांमुळे हे सर्वेक्षण रखडले होते. दरम्यान, आता ‘आरटीए’ समिती अध्यक्षांनी मान्यता दिल्यास आरटीओकडून रिक्षा थांब्याची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल जाधव यांनी दिली.

रिक्षा थांब्यांना परवानगी कोणाची?
आरटीओ, वाहतूक शाखा, महापालिकेचे प्रतिनिधी, रिक्षा संघटनेचे प्रतिनिधी, प्रवासी संघटनेचे प्रतिनिधी यांच्यामार्फत सर्व्हे केला जातो. हा अहवाल ‘आरटीओ’मार्फत ‘आरटीए’ समितीपुढे ठेवला जातो. त्यानंतर समितीकडून मान्यता मिळते किंवा नकार दर्शवला जातो. ‘आरटीए’ समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असतात. सचिव प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ), तर सदस्य पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराचे वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad Crime: कऱ्हाडला ड्रग्जप्रकरणी तिघांना अटक; पावणेतीन लाखांचे एमडी जप्त, २५ लाखांचा अन्य ऐवजही ताब्यात

Washing Machine Tips : क्षमतेपेक्षा जास्त कपडे भरल्यास खराब होऊ शकते वॉशिंग मशीन; एका वेळी किती कपडे धुवावेत? जाणून घ्या

Pune weather: जूनच्या स्वागताला पावसाची चाहूल; पुण्यात मेघगर्जना आणि विजांचा इशारा, नैऋत्य मोसमी पावसाची प्रगती

IPL 2026: RR चा फक्त १ कोटीचा जुगार; १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने ३३.८७ कोटींचा नफा कसा कमावला? पाहा संपूर्ण गणित

Ahilyanagar Crime: अहिल्यानगरात थरारक घटना; मुरुम चोरी उघडकीस आणणाऱ्या तरुणांचा पाठलाग जीवावर बेतला, जेसीबीच्या धडकेत एकाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT