पिंपरी-चिंचवड

शहरातील गावानुसार बदलतायत भाज्यांचे भाव

CD

गावांनुसार बदलताहेत भाज्यांचे भाव

आवक कमी झाल्याने दरांमध्ये वाढ ः मंडईच्या बाहेरही वाढीव दर

पिंपरी, ता. २७ ः तुम्ही जर शहरातील मध्यवर्ती भागात राहत असाल तर तुम्हाला भाज्या स्वस्त दरात मिळतील. मात्र, तुम्ही जर उपनगरांमध्ये राहत असाल तर भाज्या घेण्यासाठी तुम्हाला जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. ही स्थिती आहे पिंपरी-चिंचवड शहर व उपनगरांमधील. सद्यस्थितीत बाजारभाव काहीही असले तरी प्रत्येक उपनगरांमध्ये भाज्यांचे भाव वेगळे आहेत. विशेषतः चिंचवड, वाकड, पिंपळे सौदागर येथील उच्चभ्रू भागांमधील मंडईत दर सरासरी भावापेक्षा १० ते २० टक्क्यांनी अधिक आहेत. ठिकठिकाणी नव्याने सुरू झालेल्या सुपर मार्केटमध्ये विक्रेत्यांकडून मनमानी पद्धतीने भाज्यांचे भाव आकारले जात आहेत.
पिंपरी चिंचवडमध्ये विविध ठिकाणच्या मंडईमध्ये जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागांतून भाजीपाल्याची आवक होते. शेतकऱ्यांकडून घाऊक मार्केटमध्ये विक्री करताना जरी सारखेच भाव आकारले जात असले तरी किरकोळ विक्री करताना मात्र विक्रेते आपल्या परिसरानुसार व येणाऱ्या ग्राहकांनुसार भाव आकारत आहेत. त्यामुळे भाज्या स्वस्त झाल्यातरी काही भागांमध्ये भाव कमी झालेले दिसत नाहीत. या बाबत ‘सकाळ’ने आपल्या प्रतिनिधींद्वारे विविध भागांमध्ये केलेल्या निरिक्षणात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे भाव आकारल्याचे दिसून आले.

गावे आणि तेथील भाज्यांचे प्रती किलोमध्ये भाव
१. चिंचवडगाव भाजी मंडई /आकुर्डी भाजी मंडई /रावेत मंडई /वाकड / भोसरी मंडई / मोशी मंडई /पिंपळे सौदागर

बटाटा ः ४० रु. / ३५ ते ४० रु./३० रु./३० रु. /२५ रु /३० ते ३५रु /४० रु.
वांगी ः ५० ते ६० रु. / ७० ते ८०/४० ते ५० रु./ ६० ते ८० रु./ ५० रु. / ७० ते ८० रु./ ८० रु
भेंडी ः ६० ते ८० रु. /८० ते ९० रु. / ८० ते १०० रु./ ८० ते १०० रु. / ६० रु. / ६० ते ७० रु. / ७० रु.
टोमॅटो ः ६० ते ७० रु. / ४० रु. / २५ ते ३५ रु./ ३० ते ४० रु. / ६० रुपये /४० ते ५० रु. / १०० रु.
कांदे ः ३० ते४० रु./ २५-३० रु./ २० ते ३० रु./ २५ ते ३० रु./ २५-३० रु. /२० ते २५ / ३० रु.
कारली ः ३० ते ४० रु. /६० ते ७० रु./ ८० ते ९० रु./६०-८० रु./६० रु/६० ते ८०रु./ १०० रु.
कोबी ः १०ते २० रु.गड्डा /६० रुपये किलो /३० रुपये गड्डा / २० रुपये गड्डा/ २०-२५ रु. गड्डा /४० ते ५० प्रति किलो / ८० रुपये गड्डा
फ्लॉवर ः ५० रु. किलो/ ८० ते १०० रु. प्रतिकिलो/४० रुपये गड्डा / ४० ते ५० प्रतिकिलो (वाकड, भोसरी, पिंपळे सौदागर दर दिलेले नाहीयेत)
मेथी ( प्रति जुडी) ः २५ ते ३०/ ३० रुपये /२० ते २५रु./२० ते २५ रु./२५-३० रु./२० ते २५ रु./३० रु.
पालक - शेपू ः २५ ते ३० रु./३० रु./२० ते २५ रु/ २५ ते ३० रु. /२५ ते ३० रु./ १५ ते २० रु. / ३० रु.
कोथिंबीर ः ४० रु. / ४० रु. / ३० रु./ २५ ते ३० रु. / २५ रु./४० ते ५० रु. / ३० रु.

सुपर मार्केटमध्ये वाढीव भाव
सध्या उपनगरांमध्ये सुपर मार्केट सुरू होत आहेत. एकाच ठिकाणी किराणा, दुग्धजन्य पदार्थ व भाजीपाला विक्रीस ठेवला जात आहे. या ठिकाणीही भाज्यांचे भाव अव्वाच्या सव्वा आकारले जात आहेत. कोणत्याही भाजीचे भाव हे १२ ते २० रुपये प्रति पाव किलो एवढे आकारले जात आहेत. पालेभाज्यांचे भाव हे प्रतिजुडी किमान ३० रुपये एवढे आहेत. चौका चौकात असणाऱ्या भाजी विक्रेत्यांकडूनही याच भावामध्ये विक्री केली जात आहे.

‘पावसाळा सुरू झाल्यापासून सगळ्याच भाज्यांचे भाव वाढलेले आहेत. भाज्याही तितक्याशा चांगल्या मिळत नाहीत. भाजी मंडईत स्वस्त भाज्या मिळतात म्हणून मी नेहमी येथून भाजी घेते. मात्र आता येथेही दर वाढलेले दिसत आहेत.’
- एक महिला ग्राहक, आकुर्डी

‘सध्या भाजीपाल्याचे भाव खूपच वाढले आहेत. दररोजच्या स्वयंपाकासाठी भाजी घेणे कधी कधी कठीण होते. काही वेळा भाजी ताजीही मिळत नाही. समजतो की पावसामुळे अडचणी येतात, पण तरीही योग्य नियोजन झाले पाहिजे."
- नूतन सोनावणे, महिला ग्राहक, पिंपळे सौदागर

‘पावसामुळे मार्केटमध्ये येणाऱ्या भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे. घाऊक बाजारातच चढ्याभावाने भाजीपाला विकत घ्यावा लागत असल्याने सर्वच भाजीपाल्यांचे भाव वाढले आहे. पाऊस कमी झाल्यावर आवक वाढेल, त्यामुळे आठवड्याभरात भाव कमी होतील.
- शशीकला राठोड, भाजी विक्रेता रावेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ Final: टीम इंडियावर ४ मोठे ‘शाप’; न्यूझीलंडविरुद्ध इतिहास बदलून भारत ट्रॉफी जिंकणार का?

Gurmeet Ram Rahim Acquitted : गुरमीत राम रहीमची निर्दोष सुटका! सीबीआय कोर्टाचा निकाल हायकोर्टाने का फिरवला? पीडित कुटुंबाचं आता काय होणार?

Latest Marathi News Live Update : खांडबारा रेल्वे स्थानकावर एका मातेफिरू तरुणाचा धिंगाणा...

UPSC Result : वैभव सूर्यवंशीचे मामा होणार IPS, १०२ व्या रँकसह उत्तीर्ण केली UPSC परीक्षा

मोठी बातमी! इयत्ता पहिलीत प्रवेशासाठी नवे नियम लागू; महायुती सरकारने वयाची अट बदलली, आता किती वर्षाच्या मुलांना प्रवेश मिळणार?

SCROLL FOR NEXT