पिंपरी-चिंचवड

उद्योगनगरीची दैना

CD

पिंपरी, ता. २७ ः चाळी, गावठाणांतील बैठी घरे व झोपड्यांमध्ये पाणी शिरले; रस्त्यांवरील खोलगट भागांसह भुयारी मार्गांत पाणी साचले; रस्त्यांवर खड्डे पडले, पाण्याचा निचरा होण्यासाठी चर खोदावे लागले. अनेक नागरिकांना कामावर किंवा कामावरून घरी जायला उशीर झाला, जनजीवन विस्कळित झाले अशी अवस्था जोरदार पावसाने पिंपरी-चिंचवडकरांची केली आहे. सोमवारी सायंकाळी थोडी विश्रांती घेतलेला पाऊस रात्रभर धो-धो कोसळला. मंगळवारी दिवसभर रिपरिप सुरू होती. त्यामुळे दरवर्षी मे महिन्यात उकाड्याने हैराण होणाऱ्या नागरिकांना एसी, कुलर बंद ठेवावे लागत आहे. घराबाहेर पडताना छत्री व रेनकोट वापर करावा लागत आहे.
पिंपरी-चिंचवड परिसरात १६ मेपासून पाऊस सुरू आहे. आधी काही भागात अधून-मधून हजेरी लावलेल्या मॉन्सूनपूर्व पावसाने तीन दिवसांपासून रौद्ररूप धारण केले आहे. विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह हजेरी लावलेला पाऊस चांगलाच स्थिरावला आहे. गेल्या आठवड्यात जवळपास ६४ ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या होत्या. अनेक ठिकाणी पाणी साचले होते. त्यामुळे महापालिकेच्या नालेसफाई आणि सांडपाणी वाहिन्या व पावसाळी नलिका साफसफाईचा दावा चव्हाट्यावर आला होता. त्यामुळे महापालिकेने आठही क्षेत्रीय कार्यालयस्तरावर व अग्निशामक दलाच्या उपकेंद्र स्तरावर उपाययोजना करण्यासाठी पथके नियुक्त केली आहेत. दोन दिवसांपासून पावसाने अधिक जोर धरला आहे. त्यामुळे सर्वच रस्त्यांवर पाणी साचले आहे. त्यामुळे पुणे-मुंबई, पुणे-नाशिक व मुंबई-बंगळूर महामार्गांसह अंतर्गत रस्त्यांवर वाहतूक कोंडी होत आहे. त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे. अनेक भागात वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटनाही घडल्या आहेत. समाविष्ट गावांमध्ये अर्थात चऱ्होली, डुडुळगाव, मोशी, चिखली, रावेत, किवळे, मामुर्डी, वाकड, ताथवडे, पुनावळे येथील शेतांमधील पिकांचेही अतिपावसाने नुकसान होऊ लागले आहे.

दृष्टिक्षेपात पाऊस परिणाम
- इंद्रायणी, मुळा, पवना नद्यांच्या पाणी पातळीत वाढ, दुथडी भरून वाहू लागल्या
- मुळा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाहून आल्याने पत्र हिरवेगार
- मुंबई-बंगळूर महामार्गाच्या सेवा रस्त्यांची चाळण, मोठमोठे खड्डे
- मुंबई-बंगळूर महामार्गाखालील पुनावळे, ताथवडे, भुमकर चौक भुयारी मार्गात साचले पाणी
- पुणे-नाशिक महामार्गावर सद्‍गुरूनगर, मोशी उपबाजार भागात साचते पाणी
- मुंबई-पुणे महामार्गाच्या सेवा रस्त्यांच्या खोलगट भागासह आकुर्डी, चिंचवड, पिंपरी ग्रेडसेपरेटरमध्ये पाणी
- स्पाइन रस्त्यावर संतनगर चौक, जाधव सरकार चौक, पूर्णानगर सर्कलखाली साचले पाणी
- लोहमार्गाखालील सिद्धार्थनगर, शंकरवाडी, वाल्हेकरवाडी, रावेत भुयारी मार्गासह रस्त्यावर पाणी
- विविध कामांसाठी खोदलेले चरांसह पाणी मुरून सर्वच रस्त्यांवर खड्डे पडून खडी पसरलेली
- पुणे-मुंबई महामार्गावर मेट्रो व अर्बन स्ट्रीटचे काम सुरू असल्याने खोदकामाची ठिकाणी चिखल, वाहतूक संथगतीने

महापालिकेकडून उपाययोजना
- पाण्याचा निचरा करण्यासाठी चर खोदून पाण्याला वाट करून दिली जात आहे
- रस्ते दुभाजक व सेवा रस्त्यांसह कडेच्या झाडे-झुडपांच्या फांद्यांची छाटणी
- जुन्या झाडांच्या धोकादायक फांद्या कापून काढल्या जात आहेत
- आपत्कालीन स्थितीत अग्निशामक दलाच्या सर्वच उपकेंद्रांमिळून नऊ पथके तैनात
- अग्निशामक नियंत्रण कक्षाची हेल्पलाइन जाहीर
- आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी १२ अधिकाऱ्यांची नियुक्ती
- साचलेल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी दोन विद्युत पंपांची व्यवस्था
- खड्डे आणि चर बुजविण्यावर भर, डांबर, खडी, मुरूम, कॉंक्रीटचा वापर

- नदी काठ व पुरामुळे बाधित होणाऱ्या नागरिकांच्या स्थलांतरासाठी महापालिका शाळांमध्ये व्यवस्था
- नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा, पथके तैनात

आपत्कालीन पथक हेल्पलाइन (व्हॉटस्ॲप क्रमांक)
नियंत्रण कक्ष / ७७५७९६६०४९, ७०३०९०८९९१
पिंपरी / ८४८४०८११०१, ८४८४०८२१०१
भोसरी / ७०३०९०८९९२
प्राधिकरण / ७०३०९०८९९३
चिखली / ७०३०९०८९९५
थेरगाव / ८९५६०३९२४५
रहाटणी / ७०३०९०८९९४
मोशी / ८६००६९४१०१
तळवडे / ७०३०९०८९९६

रस्त्यांवर साचलेल्या पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी चर खोदून वाट करून दिली जात आहे. सांडपाणी वाहिन्या व पावसाळी नलिकांमध्ये अडकलेला कचरा काढून त्या मोकळ्या केल्या जात आहेत. आठही क्षेत्रीय कार्यालयस्तरावर आपत्कालीन पथके तैनात केली आहेत. मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यास त्याचा निचरा करण्यासाठी दोन विद्युत पंप तयार ठेवले आहेत. पाणी साचलेल्या व झापडपट्टीसंदर्भात आलेल्या तक्रारींनुसार त्या निस्तारणाची कार्यवाही केली जात आहे.
- मकरंद निकम, शहर अभियंता, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! एप्रिलमध्ये ‘या’ महिलांनाच मिळणार ३००० रुपये, ‘ई-केवायसी’ न केलेल्या महिलांचा बंद होणार लाभ, वाचा...

उज्ज्वला योजनेच्या महिलांच्या डोळ्यात धूर! ऑनलाइन बुकिंगसाठी ४५ दिवसांची अट; अन्नपूर्णा योजनेचा शासन निर्णय, पण अंमलबजावणी कागदावरच, वाचा...

Paneer Jowar Paratha: उन्हाळ्यात हलका पण पौष्टिक नाश्ता हवा असेल तर घरच्या घरी बनवा स्वादिष्ट पनीर ज्वारी पराठा

अग्रलेख : भारत- चीन व्यापाराचा नवा अध्याय

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : १४ मार्च २०२६ ते २० मार्च २०२६ - मराठी राशी भविष्य

SCROLL FOR NEXT