पिंपरी-चिंचवड

संवाद नागरीकांचा

CD

बालाजीनगर चौकात कचऱ्याचा ढीग
एमआयडीसी भोसरीमधील बालाजीनगर चौक जवळील शरयु टोयाटो जवळ कचऱ्याचा ढीग पडला आहे. कचरा टाकल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. येथील कचरा उचलला जात नाही किंवा वेळेत साफ केला जात नाही. कचरा कुजल्यामुळे दुर्गंधी येत आहे. त्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण झाली आहे.
- प्रशांत पोरे, भोसरी

काळेवाडी-लिंक रोड रॅम्प खुला करा
काळेवाडीकडून लिंक रोडवर उतरणारा व चढणारा रॅम्प वाहतुकीला खुला झालेला नाही. या कामाची अंतिम तारीख ३१ मार्च उलटून आता २ महिने होत आले आहेत. महाराष्ट्र दिनी त्याचे उद्‍घाटन होईल, अशी आशा होती. परंतु ते ही झाले नाही. आधीच ३ ते ४ वर्षांपासून काम सुरू होते. त्यात एकदा अंतिम तारीख वाढवली आणि ती सुद्धा संपून दोन महिने पूर्ण होतील. तरी सुद्धा हा रस्ता सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला कधी होणार ? याचे कोडे काही उलगडत नाही. आता कोणत्या मुहूर्तावर हा रस्ता चालू करणार आहेत ? असा प्रश्‍न नागरिकांना पडला आहे.
- एस. एस. पाठक, काळेवाडी

आकुर्डीतील रस्त्यावर धोकादायक भेग
आकुर्डी गावठाणातील मुख्य रस्त्यावर शितळादेवी मंदिर परिसरात धोकादायक भेग पडली आहे. त्यामुळे अपघात किंवा वाहतुकीला अडथळा होऊ शकते. वाहनांसाठी विशेषतः दुचाकीचालकांसाठी ती धोकादायक आणि अपघाताला कारणीभूत ठरू शकते. प्रशासनाने यावर काही तरी उपाय योजना करावी.
- नीलेश काटे, आकुर्डी

नाल्याच्या पाण्याने ‘मानस विहार’ पाण्यात
गेल्या वीस वर्षांत तळेगाव स्टेशन परिसरातील तपोधाम कॉलनीमधील मानस विहार सोसायटी लगतच्या नाल्याची नगर परिषद प्रशासनाने दुरुस्ती केलेली नाही. किंवा त्याची कधीच साफसफाई केली नाही. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात ही सोसायटी सांडपाण्यात पूर्णपणे डुंबत असते. पाण्याचा निचरा होत नसल्याने रहिवाशांची मोठी अडचण होत असते. त्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रशासनाने कायमस्वरूपी बंदिस्त गटार करून दिलासा द्यावा.
- दिलीप डोळस, तळेगाव दाभाडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash Investigation : अजितदादांच्या अपघाताला जबाबदार VSR विमान कंपनीची सखोल चौकशी होणार, सीआयडीने पाठवले पत्र

Baramati Tragic Accident : बारामतीत एका क्षणात हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त; मायलेकीचा जागीच मृत्यू, वडिलांसह दोन वर्षांचा चिमुरडा गंभीर जखमी

EPFO Update: PF धारकांसाठी सरकारचा मोठा निर्णय! PF वर मिळणार FD पेक्षाही जास्त व्याज; कोट्यवधी कर्मचाऱ्यांना दिलासा

Holi 2026: या गावात ६०० वर्षांपासून खेळली जाते रंगहीन होळी; एक आठवड्याने साजरा होतो सण, कारण वाचून अंगावर काटा येईल

Farmer Loan: शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी बातमी! कृषिमंत्र्यांनी विधान परिषदेत सांगितली तारीख; कर्जमाफीचा निर्णय कधी?

SCROLL FOR NEXT