पिंपरी-चिंचवड

सकाळ एज्युकेशन एक्सो

CD

‘सकाळ’च्या एज्युकेशन एक्सो शैक्षणिक प्रदर्शनामुळे पालक आणि विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमांची माहिती उपलब्ध होत आहे. सध्या संगणकावर आधारित नवनवीन अभ्यासक्रमांना प्रचंड मागणी आहे. तो ट्रेंडच आहे. औद्योगिक क्षेत्राच्या मागणीप्रमाणे विद्यार्थी अभ्यासक्रमांची निवड करत आहेत. ‘सकाळ’च्या प्रदर्शनामध्ये योग्य प्रकारची मार्गदर्शक व्याख्याने होत असल्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांची गर्दी असते.
- डॉ. बाळासाहेब वाफारे, संचालक, एमआयटी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, आळंदी


‘सकाळ’ एज्युकेशन एक्स्पोमध्ये विविध महाविद्यालये आणि विद्यापीठे सहभागी होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना करिअरच्या विविध संधींची माहिती एकाच छताखाली मिळणार आहे. हे शैक्षणिक प्रदर्शन विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे. विद्यार्थ्यांना विविध उच्चशिक्षण संस्था आणि अभ्यासक्रमांची माहिती मिळत आहे. या एक्सपोमध्ये, विद्यार्थी आणि पालकांना उच्च शिक्षणासंदर्भात योग्य मार्गदर्शन मिळत आहे.
- डॉ. गिरीश देसाई, कार्यकारी संचालक, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट

‘‘आता हळूहळू ‘एआय’चा उपयोग अध्ययन, अध्यापन प्रक्रियेसह एकूणच शिक्षण क्षेत्रात सुरू झाला आहे. ‘एआय’च्या वापरातून विद्यार्थ्यांसाठी अध्ययन प्रक्रिया सुलभ करता येईल. विद्यार्थ्यांची संख्या वाढण्याबरोबरच शिक्षणाची गोडी वाढेल यादृष्टीने ‘एआय’ उपकरणे विकसित करणे आवश्यक आहेत. चांगले शिक्षण उपलब्ध करण्यासाठी ‘एआय’ तंत्रज्ञानाचा शैक्षणिक धोरणात समावेश करायला हवा.’’
- डॉ.संदीप पाचपांडे, एएसएम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट


‘‘आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये शासनाचे मोफत पॅरामेडिकल अभ्यासक्रम घेण्यात येतात. एससी विद्यार्थ्यांना बार्टीमार्फत दर महिन्याला ४००० रूपये अनुदान मिळते. मराठीमधून शिकण्याची संधी मिळते. प्रशिक्षणानंतर नोकरी व व्यवसायासाठी मदत होते. ‘सकाळ’च्या एज्युकेशन एक्स्पोमध्ये विविध महाविद्यालये आणि विद्यापीठ संलग्न महाविद्यालये सहभागी होत असल्याने विविध पर्याय निवडीसाठी उपलब्ध आहेत. ’’
- डॉ. गणेश अंबिके, संचालक, मोरया सामाजिक प्रतिष्ठान संचालित लोकनेते आमदार लक्ष्मण जगताप पॅरामेडिकल कॉलेज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रियांका चोप्राने मुलीच्या जन्मासाठी सरोगसी करायचं का ठरवलं? ट्रोल करणाऱ्यांना उत्तर देत म्हणाली- माझं बाळ हे...

Petrol Storage: भारतात पेट्रोलचा साठा कसा आणि कुठे केला जातो? जाणून घ्या भारताच्या स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्हची संपूर्ण माहिती

Latest Marathi News Live Update : सोलापुरात मराठा क्रांती मोर्चाचा तीव्र आंदोलनाचा इशारा; महापौर पदावरून वाद चिघळला

Arjun Tendulkar Marriage: अर्जुनचं लग्न लागलं, वरमाळा घालताच सानियाला मारली मिठी; सचिन-अंजली अन् साराही खूश; Video Viral

Rajya Sabha Election Maharashtra : राज्यसभेसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटचा दिवशी शिंदे गटाकडून उमेदवार निश्चित, एकनाथ शिंदेंचा धक्कातंत्र

SCROLL FOR NEXT