पिंपरी-चिंचवड

मुंबईकडून येणाऱ्या रेल्वेगाड्यांना उशीर

CD

पिंपरी, ता. २७ : मोसमी पावसाच्या तडाख्याने रस्ते, महामार्गांवर पाणी साचले. त्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावून कोंडी होत आहे. सोबतच या पावसाने रेल्वे सेवाही विस्कळित झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने मुंबईकडून येणारी चेन्नई एक्स्प्रेस, कोयना एक्स्प्रेससह लांब पल्ल्याच्या अनेक रेल्वेगाड्या मंगळवारी (ता.२७) उशिराने धावत होत्या.
हंगामातील पहिल्याच पावसाने मुंबईत रेल्वे रुळांवर पाणी साचले होते. त्यामुळे सोमवारी (ता.२६) प्रगती, हैदराबाद आणि कोणार्क एक्स्प्रेस सुमारे एक ते दीड तास उशिराने, तर काही एक्स्प्रेस पंधरा ते वीस मिनीटे उशिराने धावत होत्या. मंगळवारीदेखील पुणे आणि मुंबईला पावसाने झोडपले. त्यामुळे मुंबईहून सुटणाऱ्या चेन्नई एक्स्प्रेससह कोयना एक्स्प्रेस पाऊण ते एक तास उशिराने धावत होत्या. तर, इतर एक्स्प्रेस २० ते ३० मिनिटे उशिराने धावत होत्या. मात्र, पुणे- लोणावळा लोकल सेवा नियोजित वेळेनुसार सुरू होती. तसेच पुण्यातून सुटणाऱ्या एक्स्प्रेसही वेळेत धावत होत्या.

सोमवारी मुंबईवरुन येणाऱ्या काही एक्स्प्रेस गाड्यांना उशीर झाला. पण, मंगळवारी कोयना आणि चेन्नई वगळता इतर एक्स्प्रेस सुरळीत होत्या. पुण्याहून सुटणाऱ्या एक्स्प्रेस वेळेत धावत आहेत.
- हेमंतकुमार बेहरा, जनसंपर्क अधिकारी, मध्ये रेल्वे-पुणे विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harish Rana Case: हरिश राणाच्या इच्छामरणासाठी १३ वर्षे का लागली? कायदा, कोर्ट आणि वेदनेची पूर्ण कहाणी; ही पहिलीच केस नाही तर…

UPSC Fake Rank Case : युपीएससी उत्तीर्ण तरुणाचा आमदार अन् पोलिसांनी केला सत्कार; सत्य समजताच सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली

Indian Women Hockey: पात्रता मिळवली, आता लक्ष्य विजेतेपदाचे; भारतीय महिला हॉकी संघाचा आज इटलीविरुद्ध उपांत्य सामना

Viral Video: व्हायरल होण्यासाठी वादग्रस्त कृत्य! चेंबूरमध्ये आगरी-कोळी परंपरेचा अपमान, व्हिडिओनंतर उसळला संताप

'मी तिला किस करणार नाही' संजय दत्तने 'या' अभिनेत्रीसोबत किसिंग सीन करण्यास दिलेला नकार, म्हणालेला...'तिला मी...'

SCROLL FOR NEXT