पिंपरी-चिंचवड

मृत वैष्णवी हगवणे यांना कॅण्डल मार्चद्वारे श्रद्धांजली

CD

पिंपरी, ता.२७ ः मृत वैष्णवी हगवणे यांना श्रद्धांजली देण्याबरोबरच त्यांच्या न्यायाची लढाई अजून बळकट करण्यासाठी मोरवाडी एसएनबीपी विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कॅण्डल मार्च काढला.
पिंपरी चौकातील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना विद्यार्थ्यांनी अभिवादन केले. त्यानंतर हा कॅण्डल मार्च डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत गेला. विद्यार्थ्यांनी कॅण्डल प्रज्वलित केल्या. शेवटपर्यंत लढण्याची व समाजात असे निष्पाप बळी पुन्हा जाऊ नये म्हणून शिव - फुले - शाहू - आंबेडकर यांच्या विचारांतून सामाजिक परिवर्तन घडवण्याची विद्यार्थ्यांनी प्रतिज्ञा घेतली. विद्यार्थी प्रतिनिधी महेश खांडेकर, प्रशांत मोरे, विशाल मानकर, स्नेहल लांडगे, पंकज गीते, अश्विन आखाडे, अक्षय कुल व अभिराज कांबळे यांच्या मनोगत व्यक्त केले.
यावेळी ज्ञानल सांडभोर, स्नेहल लांडगे, स्मृती भोसले, नम्रता कांबळे, श्रेष्ठी शेळके, तुषार मानकर, शांताराम गायकवाड, विशाल मानकर, तानाजी निंबाळकर आदींसह इतर अनेक विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्ते माऊली जोराडे सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. कॅण्डल मार्च यशस्वी करण्यासाठी महेश खांडेकर, अक्षय कुल, रूपेश कुचेकर, प्रेम बर्वे, तानाजी निंबाळकर, हर्ष गोढवानी, ज्ञानल सांडभोर, स्मृती भोसले, नम्रता कांबळे, स्नेहल लांडगे यांनी परिश्रम घेतले. अभिराज कांबळे यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO Insurance: लहान फॉर्म अन् मोठा फायदा! PF खात्यातील या फॉर्मने कुटुंबाला मिळू शकतात 7 लाख रुपये

Hasan Mushrif Kolhapur ZP Political Strategy : बहुमत असूनही पेच? पण मुश्रीफांनी करून दाखवलं 'अशक्य ते शक्य'; कसं जुळवलं सत्तेचं समीकरण? वाचा सविस्तर...

Latest Marathi News Live Update : कल्याण मध्ये गुढीपाडव्याच्या निमित्ताने भव्य मिरवणूक

Thane politics: राजकीय खळबळ! ‘उबाठा’चे चार नगरसेवक शिंदे गटात; मध्यरात्री ठाण्यात पक्षप्रवेश, जिल्हाप्रमुखांच्या हाती ‘धनुष्यबाण’

Crime News : बॅनरवर फोटो खाली का? नाशिकमध्ये नामांकित कॉलेजच्या विद्यार्थ्याचे अपहरण करून रात्रभर डांबले

SCROLL FOR NEXT