चिंचवड, ता. १ : ‘‘स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जीवन हे शौर्य, देशभक्ती आणि बुद्धिमत्तेचे प्रतीक आहे. सावरकरांच्या त्यागाने आणि विचारांनी स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांना प्रेरणा मिळाली. आजही त्यांचे विचार आणि कार्य आपल्याला स्फूर्ती देतात,’’ असे प्रतिपादन राजर्षी शाहू महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जितेंद्र होले यांनी केले.
चिंचवडच्या राजे संभाजीनगर येथील सिद्धिविनायक मंदिरात स्वा. सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रसंगी स्वा. सावरकर प्रतिष्ठान, स्वा. सावरकर मित्र मंडळ, सिद्धिविनायक जेष्ठ नागरिक संघ यांचे पदाधिकारी, सदस्य तसेच परिसरातील सावरकरप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. होले म्हणाले, ‘‘वीर विनायक दामोदर सावरकर हे भारताचे थोर स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारी, विचारवंत, लेखक आणि समाजसुधारक होते. सावरकरांना अंदमानच्या सेल्यूलर जेलमध्ये काळ्या पाण्याची शिक्षा झाली. इतके सहन करूनही त्यांनी देशासाठी झुंज थांबवली नाही. सावरकरांचे विचार खूप प्रागतिक होते. अस्पृश्यता दूर करण्यासाठीही त्यांनी काम केले. सावरकरांचे हिंदुत्व हे सर्वसमावेशक आणि राष्ट्रभक्तीवर आधारित होते.’’
या प्रसंगी सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरविंद वाडकर यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.