पिंपरी-चिंचवड

भोसरी-चाकण एमआयडीसीचा वार्षिक कौटुंबिक मेळावा उत्साहात

CD

पिंपरी, ता. १ : भोसरी-चाकण एमआयडीसी उद्योजक संघटनेच्या वतीने आयोजित वार्षिक कौटुंबिक मेळाव्याला मोठा प्रतिसाद मिळाला. यंदाच्या संमेलनात उद्योजक संघटनेने दोन महिला उद्योजकांना पुरस्कार देऊन सन्मानित केले तसेच दहावी-बारावीतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
चिंचवड येथे पार पडलेल्या कौटुंबिक मेळाव्यात एस्टेरॉइड क्रशिंग अँड स्क्रीनिंग प्रा. लि.च्या संचालिका शकुंतला दगडे आणि एस. बी. आर. मशीन्स प्रा. लि.च्या संचालिका प्राजक्ता राऊत यांना ‘उत्कृष्ट महिला उद्योजिका २०२५’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
अध्यक्ष जयदेव अक्कलकोटे म्हटले, ‘‘आजकाल महिला केवळ चूल आणि मूल एवढ्या पुरत्याच मर्यादित राहिल्या नाहीत. तर त्यांनी आपल्या कार्याच्या कक्षा रुंदावल्या आहे. उद्योग व्यवसायात महिलांचेदेखील मोठे श्रम व त्याग असतो.’’
कार्यक्रम यशस्वितेसाठी चाकण एमआयडीसी उद्योजक संघटनेचे सचिव निवास माने, उद्योजिका संघटना प्रमुख पौर्णिमा शिंदे, खजिनदार किसन गायकवाड, संचालक दत्तात्रय दगडे आणि संचालक प्रवीण शिंदे यांनी मेहनत घेतली. अध्यक्ष अक्कलकोटे यांनी आभार मानले.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब चालकांनो लक्ष द्या! ओला-उबर चालवायची असेल तर आधी ५ दिवसांचे प्रशिक्षण अनिवार्य; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

IND vs ZIM: "जे प्रॅक्टिसमध्ये करतो, तेच मॅचमध्येही..." वैभव सूर्यवंशी 'प्लेअर ऑफ द सीरिज' पुरस्कार जिंकल्यावर काय म्हणाला?

Police Station Fire : भायखळा पोलिस ठाण्यात अचानक आग; ऐतिहासिक इमारतीच्या पहिल्या मजल्याला आग

10 Point Action Plan for Women Safety : महिला सुरक्षेसाठी जिल्हास्तरावर 10 कलमी राष्ट्रीय कृती आराखडा; NCW चा महत्त्वाचा निर्णय

Rahul Gandhi: 'विद्यार्थ्यांवर पॅलेट गन चालवण्याचा आदेश कोणी दिला?' राहुल गांधींचा अमित शहांना थेट सवाल; पत्र लिहून मागितले उत्तर

SCROLL FOR NEXT