पिंपरी-चिंचवड

रिंगरोडसाठी भूसंपादनाच्‍या कामाला गती मिळणार

CD

प्रदीप लोखंडे : सकाळ वृत्तसेवा

पिंपरी, ता. ३१ : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्‍या (पीएमआरडीए) वतीने होणाऱ्या रिंगरोडच्‍या भूसंपादन कामाला आता गती मिळणार आहे. पीएमआरडीएच्‍या हद्दीतून जाणाऱ्या रिंगरोडसाठी आवश्‍यक असलेल्‍या जमिनीची मोजणी मार्च २०२५ मध्ये पूर्ण झाली आहे. हवेली भूमी अभिलेख आणि उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्याल‍याकडून हवेली आणि खेड तालुक्यातील ६७.३९ हेक्‍टर गटांच्‍या क्षेत्राची मोजणी करण्यात आली आहे. त्याबाबतचे विवरणपत्र पुण्याचे जिल्‍हाधिकारी यांच्‍याकडे पाठविले आहे. भूसंपादनासाठी पुढील कार्यवाही करण्यासाठी आणखी सुलभता येणार आहे.
पीएमआरडीएकडून विकसित करण्यात येणारा रिंगरोड हा एक महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी आणि इतर शहरांमधून पुण्यात येणारी अवजड वाहतूक बाहेरुन वळविण्याच्या दृष्टीकोनातून या रिंगरोडचे काम हाती घेण्यात आले आहे. सोळू ते परंदवाडी या टप्प्यात रिंगरोड केला जाणार आहे. एकूण ८२.३८ किलोमीटर अंतरासाठी ६५ मीटर रुंदीचा रस्ता असणार आहे. रिंगरोड सुरुवातीला ११० मीटर रुंदीचा करण्यात येणार होता. मात्र, नागरिकांचा विरोध झाल्याने त्याची रुंदी ६५ मीटर निश्चित करण्यात आली आहे. रिंगरोडच्या पहिल्या टप्प्यात सोळू ते वडगाव शिंदे या सुमारे ५.४० किलोमीटर अंतरात काम केले जाणार आहे. खेड तालुक्‍यातील सोळू, वडगाव शिंदे आणि निरगुडी येथील जमिनीची मोजणी २०२४ मध्ये पूर्ण करण्यात आली आहे. तीनही ठिकाणची मिळून २८.२ हेक्‍टर गटाच्‍या क्षेत्राची मोजणी पूर्ण करण्यात आली आहे.

पहिल्‍या टप्‍प्‍यातील मोजणी पूर्ण झाल्‍यानंतर दुसऱ्या टप्‍प्‍यातील मोजणीची कार्यवाही पीएमआरडीएच्‍या भूमी अभिलेख आणि उपअधीक्षक भूमी अभिलेख, हवेली विभागाकडून समन्वयाने सुरू करण्यात आली. हवेली तालुक्‍यातील आंबेगाव खुर्द, भिलारेवाडी, मांगडेवाडी, निंबाळकरवाडी, पिसोळी, वडाचीवाडी आदी गावांतील एकूण गटांच्‍या क्षेत्राची मोजणी पूर्ण करण्यात आली. या सर्व गावांमधून एकूण ३९.१९ हेक्‍टर गटांची मोजणी मार्च २०२५ मध्ये पूर्ण झाली आहे. त्‍याचा अहवालही पीएमआरडीएच्‍या भूमी अभिलेख विभागाने जिल्‍हाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. जिल्‍हाधिकाऱ्यांमार्फत भूसंपादनासाठी पुढील प्रक्रिया राबवली जाणार आहे.

हवेली तालुक्‍यातील गावांमधील झालेली मोजणी (हेक्‍टरमध्ये)
आंबेगाव खुर्द - १०.८२
भिलारेवाडी - १.६३
मांगडेवाडी - १५.९४
निंबाळकरवाडी - ३.७०
पिसोळी - ५.४६
वडाचीवाडी १.६४

खेड तालुक्‍यात २०२४ मध्ये पूर्ण झालेली मोजणी
सोळू - १३.१७
वडगाव शिंदे - ५.७१
निरगुडी - ९.३२


रिंगरोडसाठी जिल्‍हाधिकाऱ्यांमार्फत भूसंपादन करण्यात येणार आहे. त्‍यासाठी हवेली तालुक्‍यातील काही गावांतील गटांच्‍या क्षेत्राची मोजणी पूर्ण झाली आहे. उपअधीक्षक हवेली कार्यालयाकडून ही मोजणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मोजणीचे विवरणपत्र जिल्‍हाधिकाऱ्यांकडे दिले आहे. त्‍यांच्‍यामार्फत पुढील कार्यवाही केली जाईल.
- आशा जाधव, अधीक्षक, भूमी अभिलेख, पीएमआरडीए

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मॉकड्रिलवेळी हातात फुटलं ग्रेनेड, ४ पोलीस गंभीर जखमी; अहिल्यानगरमध्ये दुर्घटना

जास्त भावुक नका होऊ! कॉकरोच जनता पार्टीविरोधात याचिका, सरन्यायाधीश काय म्हणाले?

Share Market: पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे शेअर बाजारातील या 3 शेअरमध्ये मोठी तेजी!

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरात पेट्रोल चोरांचा धुमाकूळ; राजारामपुरीतील रहिवासी त्रस्त

Electricity Bill Reducing Tips : उन्हाळ्यात लाईट बिल प्रचंड वाढवतात 'ही' 3 छोटी उपकरणे, आजच वापर करा कमी

SCROLL FOR NEXT