महाविद्यालयात मंगळवारी योगोत्सव
पिंपरी, ता. ३१ ः केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या वतीने देशभर होणाऱ्या योग दिनाच्या प्रचारार्थ पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या वतीने योगा दिन जागृतीसाठी योगोत्सवाचे आयोजन केले आहे, अशी माहिती प्राचार्य डॉ. प्रशांत खाडे यांनी दिली. हा योगोत्सव ३ जून सकाळी सात त पावणेआठ या वेळेत डॉ. डी. वाय पाटील आयुर्वेद महाविद्यालय आणि संशोधन केंद्र पिंपरी येथे होणार आहे. केंद्र सरकारने ‘शंभर दिवस शंभर शहरात,शंभर आयोजन’ हा योगदिनापूर्वी जनजागृती कार्यक्रम राबवत आहे. आयुष मंत्रालय मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थेच्या माध्यमातून हा उपक्रम देशभरात राबवत आहे. त्याच्याच हा एक भाग आहे. यावेळी शहरातील ६०० जण सहभागी होणार आहे.
तीन संशोधकांच्या
शोधाचा गौरव
पिंपरी, ता. ३१ ः कोईम्बतूर, तमिळनाडू येथे झालेल्या यूइर (Uyir) रोड सेफ्टी हॅकेथॉन अंतिम स्पर्धेत प्रा. डॉ. रविराज सोरटे, प्रा. डॉ. अविनाश खरात व प्रा. डॉ. नंदकुमार धर्माधिकारी यांच्या संशोधन अंतिम स्पर्धेत निवड झाली आहे. या संशोधनाचा विशेष सन्मान करण्यात आला. श्रीकृष्ण कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी युइर (Uyir) या एनजीओच्या माध्यमातून कोइमतूर शहरांमध्ये आयोजित केलेल्या रोड सेफ्टी हॅकॅथॉनचे स्पर्धेमध्ये एकूण तीन हजारपेक्षा अधिक संशोधन प्रकल्प सहभागी झाले होते. यात १२ राज्यांमधून १४५ पथके सहभागी झाल्या होती. पुण्यामधून गेलेल्या या तिघांच्या पथकाने दोन प्रस्ताव सबमिट केले होते. सोसायटी फोर ऍडव्हान्समेंट ऑफ डाउझिंग यांच्याकडून या तिघांचे दोन प्रस्ताव अंतिम फेरीसाठी निवडले. भूगर्भातील पाण्याच्या प्रवाहामुळे तयार होणाऱ्या लहरींमुळे होणारे अपघात व त्यावरील उपाय योजना हे दोन विषय या तिघांनीही अत्यंत तांत्रिक पद्धतीने परीक्षकांसमोर मांडले. प्रा. सोरटे यांनी लावलेल्या जमिनीखालील पाण्याचा प्रवाह या शोधामुळे आजतागायत शंभर बोअरवेलचे अचूक पॉईंटचे निदान केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.