हिंजवडी फेज एकमध्ये रस्त्यांची दुरवस्था
हिंजवडी फेज एक येथील रस्त्यावरील अतिक्रमणे आणि खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होत आहे. पावसाळा तोंडावर असतानाही रस्त्यांची दुरुस्ती न झाल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून अतिक्रमणामुळे रस्ते अरुंद झाले आहेत. त्यामुळे मोठमोठी वाहने या मार्गावरून जात असताना वाहतुकीचा खोळंबा होतो. परिणामी, कर्मचारी व स्थानिक रहिवाशांना रोजच्या प्रवासात अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्थानिक प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन रस्त्यांची दुरुस्ती व अतिक्रमण हटवावे.
- आनंद चौगुले, हिंजवडी फेज ३
प्राधिकरणातील बेवारस घर पाडा
प्राधिकरणातील बकाल घर सेक्टर क्रमांक २५ दक्षिणमुखी मारुती मंदिर समोर एलआयजीमधील घर गेली ४५ वर्षे बंद असून मालक बेपत्ता आहे. संपूर्ण घर पडक्या अवस्थेत झाल्या असून कोसळण्याची भीती आहे. उंदीर, घुशी, कचरापेटी व अवैध कामासाठी गुंड त्याचा वापर करतात. महापालिकेने हे घर ताबडतोब पाडून लोकांचा जीव वाचवावा, अशी सर्व रहिवाशांकडून विनंती आहे.
- दत्ता धामणस्कर, एलआयजी कॉलनी, प्राधिकरण
ठेकेदारावर कारवाई करा
यमुनानगर, निगडी येथील स्कीम ११, बिल्डींग ४४ समोर नुकतेच गतिरोधकाचे काम करण्यात आले. उर्वरित ब्लॉक रस्त्यात पडून आहेत. त्याने अपघाताचा धोका संभवतो. संबंधित महापालिका अधिकाऱ्यांनी योग्य ती कार्यवाही करावी. काम पूर्ण झाल्यावर राडारोडा न उचलणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करावी.
- सारंग कुलकर्णी, यमुनानगर
रस्त्यावरची फांदी उचला
चिंचवडजवळ केशवनगर भागांत पोद्दार हायस्कूलच्याजवळ काकडे पार्कच्या ‘पी’ इमारती समोरच्या रस्त्यावर झाडाची फांदी तुटून पडली आहे. महानगरपालिकेने ती फांदी त्वरित हटवावी.
- सां. रा. वाठारकर, चिंचवड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.