पिंपरी-चिंचवड

तीन हजार किलोमीटर प्रवास; तरीही नीलेश अडकलाच!

CD

पिंपरी, ता. ३१ : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील दहा दिवस फरारी असलेल्या सहआरोपी नीलेश चव्हाणने तीन हजार किलोमीटरचा मोटारीने प्रवास, ठावठिकाणा समजू नये म्हणून ऑनलाइन ट्रान्झेक्शन टाळण्यासाठी जवळ मोठी रोकड बाळगली. संपर्कासाठी तीन मोबाईल व चार ते पाच सिमकार्ड घेतले. एवढ्यावरच न थांबता नेपाळमध्ये दाखल झाल्यानंतर पुन्हा आणखी एक सिमकार्ड घेतले. अशाप्रकारे शांत डोक्याने नियोजन करून त्याने पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे अखेर नीलेश चव्हाण पोलिसांच्या हाती लागलाच.
वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणी बावधन पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात २४ मे रोजी कलम वाढ करून नीलेश चव्हाण यालाही सहआरोपी केले. कस्पटे कुटुंबीय त्याच्याकडे वैष्णवी यांचे बाळ आणण्यासाठी गेले असता त्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून धमकाविले होते. त्या प्रकरणातही वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात चव्हाण याच्यावर गुन्हा दाखल झाला. हे गुन्हे दाखल झाल्यापासून चव्हाण पसार होता. पोलिसांकडून त्याचा कसून शोध घेतला जा होता. मात्र, तो हाती लागत नव्हता.

अटकपूर्व जामिनासाठी शर्थीचे प्रयत्न
या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी नीलेशने शर्थीचे प्रयत्न केले. जामिनासाठी ऑनलाइन कॉलवरून तो वकिलांच्या संपर्कात असल्याचेही समोर येत आहे. कागदपत्रांसह इतर माहिती गोळा करण्यासाठी त्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र, त्या अगोदरच त्याच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या.

असा केला प्रवास
गुरुवारी (ता.२२) गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस शोध घेत असल्याचे समजल्यानंतर नीलेशने त्याच दिवशी पुणे सोडले. मोटारीने रायगड, ठाणे, कर्जत, मुंबई गाठले. शुक्रवारी (ता. २३) तो दिल्लीच्या दिशेने रवाना झाला. गुजरात, राजस्थानमार्गे सोमवारी (ता. २६) सकाळी तो दिल्लीत पोहोचला. दिल्लीहून तो गोरखपूरला गेला. मंगळवारी (ता. २७) नेपाळमधील भैरवाह येथे गेला. शुक्रवारपर्यंत (ता. ३०) तो तेथेच होता. शुक्रवारी उत्तर प्रदेशमधील महाराज गंज येथील सौनोली येथे आल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

थेरगाव रुग्णालयात वैद्यकीय तपासणी
गोरखपूर येथून पोलिस त्याला विमानाने शनिवारी (ता. ३१) पहाटे पुणे विमानतळावर घेऊन आले. तेथून त्याला वैद्यकीय तपासणीसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या थेरगाव रुग्णालयात नेले. तीनच्या सुमारास त्याची वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर पहाटे चारच्या सुमारास त्याचा ताबा बावधन पोलिसांकडे देण्यात आला.

मोबाईल बंद पडल्याची मारायचा थाप
आपले ठावठिकाणा समजू नये, यासाठी नीलेश हा नेपाळमधील स्थानिक नागरिकांच्याही मोबाईलचा वापर करायचा. यासाठी तो स्वतःचा मोबाईल बंद पडल्याची थाप नेपाळमधील नागरिकांना मारायचा. तसेच रिचार्ज संपल्याचे खोटे सांगून वायफायचा देखील वापर करीत असल्याचे समोर येते.

कसा सापडला नीलेश चव्हाण
दिल्लीहून गोरखपूरला जाण्यासाठी नीलेशने खासगी बसचा वापर केला. बसमधील सीसीटीव्ही सुटेजमध्ये नीलेश दिसत आहे. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तीन दिवस विविध शेकडो सीसीटीव्हीचे निरीक्षण केले. त्यामध्ये नीलेश नेपाळला गेल्याचे समोर आले. यासह तांत्रिक विश्लेषणही करण्यात आले. त्यावरून नीलेश हा ३० मे रोजी भारत-नेपाळच्या सीमेवरील उत्तरप्रदेशमधील महाराज गंज येथील सौनोली येथे असल्याचे समोर आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Airport Threat : पुणे विमानतळावर हाय अलर्ट! गुवाहटीला जाणाऱ्या विमानात आढळली धक्कादायक चिठ्ठी, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण, तपास सुरू

Marathi literature decade review : ‘दशकातले लेखक’; २०१०-२०२० मधील मराठी साहित्यप्रवाहाचा सखोल वेध

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंनी उपोषण सोडल्यानंतर पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; माझ्या घातपाताचा प्रयत्न कुणी केला?

Prize Money: IPL 2026 चा विजेता होणार मालामाल! चॅम्पियन संघाला मिळणार 'इतके' कोटी रुपये, तर उपविजेत संघालाही मिळणार 'इतके' कोटी

Mumbai Goa Highway Accident: ट्रकवर मोटार आदळून अहिल्यानगरच्या माय-लेकी ठार; मुंबई-गोवा महामार्गावर पोलादपूरजवळ अपघात, बाप-लेक जखमी

SCROLL FOR NEXT