पिंपरी-चिंचवड

गुन्हे वृत्त

CD

टेम्पो ट्रॅव्हलर चालकाला लुटले
पिंपरी : चिंचवडमधील जुन्या जकात नाक्याजवळ टेम्पो ट्रॅव्हलरच्या चालकाला बेदम मारहाण करून गुंडांनी त्याच्या खिशातील बाराशे रुपये जबरदस्तीने काढून घेतले. या प्रकरणी प्रकाश मिसाळ (रा. म्हातोबानगर झोपडपट्टी, वाकड) यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी माऊली शिंदे याला अटक केली असून आदित्य आणणे, रोशन बल्लाळ (तिघेही रा. वेताळनगर झोपडपट्टी, चिंचवड) यांच्यावर गुन्हा दाखल केला. फिर्यादी टेम्पोत झोपले असताना आरोपींना त्यांना खाली ओढले. त्यांना शिवीगाळ करून दांडक्याने डोक्यात मारण्यात आले. ''मी इथला भाई आहे, तू मला ओळखत नाही का,'' असे म्हणत त्यांना धमकी देण्यात आली.
----------------------------
विश्वासघातप्रकरणी एकावर गुन्हा
पिंपरी : ग्राहकाला दाखविण्याच्या नावाखाली नेलेली मोटार परत आणून न देता एकाचा विश्वासघात केल्याप्रकरणी भोसरी पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला. या प्रकरणी सुधीर बागलाने (रा. भोसरी) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार बाळासाहेब घेनंद (वय ४५, रा. गव्हाणेवस्ती, भोसरी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादी व आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपीने ग्राहकाला मोटार दाखवायची असल्याचे सांगून फिर्यादीची दीड लाख रुपये किमतीची मोटार नेली. त्यानंतर मोटार परत आणली नाही तसेच रक्कमही दिली नाही.
------------

सदनिका बळकावल्याप्रकरणी गुन्हा
पिंपरी : बँकेच्या ताब्यातील एका सदनिकेचा बेकायदा ताबा घेतल्या प्रकरणी चिंचवडमध्ये एकावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी अजय रजपूत (रा. गुलटेकडी, पुणे) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अमोल मोंडोकर (वय ५०, रा. चिंचवड) याच्यावर गुन्हा दाखल केला. आरोपीने पुणे पीपल्स बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड केली नाही. त्यामुळे बँकेने तारण ठेवलेल्या त्यांच्या सदनिकेचा कायदेशीर ताबा घेतला. तरीही आरोपीने सील तोडून सदनिकेत घुसखोरी केली.
---------------
कोयता बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक
पिंपरी : कोयता बेकायदारित्या बाळगल्याप्रकरणी रावेत पोलिसांनी रमाबाईनगर येथे दोघांना अटक केली. अविनाश लोखंडे (वय १९, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) व स्वप्नील वायदंडे (वय १९, रा. वेताळनगर, चिंचवड) अशी आरोपींची नावे आहेत.
------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anurag Thakur : जेव्हा देशाला गरज असते तेव्हा गांधी दांड्या मारतात; अनुराग ठाकूर यांची टीका

Beed Crime: बीडच्या परळीमध्ये धक्कादायक घटना! पोट फाडून पत्नीचा खून; नेमकं काय घडलं?

Mumbai News : आरक्षण वर्गीकरणाच्या न्या. बदर समितीला सहा महिन्याची मुदतवाढ

Pune News : प्रमुख जिल्हा न्यायाधीश मैदानात; दंड भरण्यासाठी आलेल्या नागरिकांना केले सहकार्याचे आवाहन

Vishwas Pathak : जीएसटी कमी झाल्याने नागरिक आनंदी; भाजप प्रवक्ते विश्‍वास पाठक

SCROLL FOR NEXT