पिंपरी-चिंचवड

क्राइम

CD

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
पिंपरी ः भरधाव ट्रकने मागून धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. आंबेठाण ते वासुली मार्गावरील साक्षी कंपनीजवळ ही दुर्घटना घडली. प्रभाकर गुंजाळ (३७, कोरेगाव बुद्रूक) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी संतोष गुंजाळ (३०, कोरेगाव बुद्रूक) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून ट्रकचालक बाबूलाल जाट (वय ४३, रा. जयपूर, राजस्थान) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. अंगावरून ट्रकचे चाक गेल्याने गुंजाळ यांचा जागीच मृत्यू झाला.
---------
कंपनीला १० लाखांना फसविले
पिंपरी ः एका लेखापालाने १५ ग्राहकांकडून आलेले १० लाख ५७ हजार ७७९ रुपये कंपनीच्या खात्यात जमा न करता स्वतःच्या फायद्यासाठी वापरले. २०२३ पासून १४ एप्रिल २०२५ दरम्यान चिंचवडमधील लक्ष्मी संकुलातील डी. सी. सी. इन्फोटेक कंपनीत हा प्रकार घडला. या प्रकरणी रोहित पुरी (वय ३६, रा. आकुर्डी) यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून रोहन अजिंक्य (वय ३८, रा. तळेगाव दाभाडे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीने पैसे जमा झाल्याची पावती ग्राहकांना दिली, परंतु रक्कम कंपनीच्या बँक खात्यात जमा केली नाही.
------
मालकाला सात लाखांचा गंडा
पिंपरी ः वॉशिंग सेंटरमधील कामगाराने आपल्या मालकाचा विश्वास संपादन करून पगार आणि इतर कामांसाठी घेतलेले सात लाख ३३ हजार ३०० रुपये स्वतःच्या फायद्यासाठी वापरले. ९ ते १३ सप्टेंबर दरम्यान चिखलीतील सुदर्शननगरमध्ये हा प्रकार घडला. या प्रकरणी विलास फटांगरे (वय ५५, चिखली) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून धनंजय जेवे (वय २८, रा. आष्टी, जि. बीड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीने पगारासाठी एक लाख ८५ हजार, गहाण ठेवलेले सोन्याचे दागिने सोडवण्यासाठी पाच लाख आणि क्रेडिट कार्डद्वारे ४८ हजार ३०० रुपये घेतले. त्याने ही रक्कम फिर्यादीला परत केली नाही.
------
धमकीचा जाब विचारल्याने मारहाण
पिंपरी ः फोनवरून शिवीगाळ आणि धमकी दिल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला मारहाण करण्यात आली. १४ सप्टेंबरला भोसरीतील दिघी मार्गावरील वैष्णवी बिल्डिंगमध्ये हा प्रकार घडला. या प्रकरणी सुनील बिरादार (वय ४४, रा. पिंपळे गुरव) यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून योगेश सिंग (वय ३२, रा. भोसरी), त्याची पत्नी आणि त्यांच्या एक अनोळखी साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला.
----------
डिलिव्हरी बॉयला मारहाण
पिंपरी ः ऑनलाइन फूड डिलिव्हरीसाठी फेक आयडी वापरल्याचा जाब विचारल्यामुळे एका डिलिव्हरी बॉयला त्याच्या तीन सहकाऱ्यांनी मारहाण केली. मंगळवारी (ता. १६ सप्टेंबर) सायंकाळी पिंपळे गुरवमधील कल्पतरू सोसायटीजवळ हा प्रकार घडला. या प्रकरणी मंगेश मुंडेवाड (वय २०, पिंपळे सौदागर) यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून हर्षद खरबान, त्याचा भाऊ आणि इतर एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार ऑर्डर घेण्यासाठी थांबले असताना आरोपीचा भाऊ फेक आयडी वापरून ऑर्डर देत होता. त्याचा जाब विचारला. त्यामुळे आरोपींनी शिवीगाळ करून तसेच हातातील लोखंडीकडे फिर्यादीच्या डोक्यात मारून त्यांना जखमी केले. फिर्यादीचे मित्र अमित गुप्ता आणि सचिन जाधव यांनाही मारहाण करण्यात आली.
---------
मोबाईल चोरणाऱ्यास अटक
पिंपरी ः येथील वायसीएम रुग्णालयाच्या परिसरात रुग्णांच्या नातेवाईकांचे मोबाईल चोरणाऱ्या चोरट्याला संत तुकाराम नगर पोलिसांनी अटक केली. एक मोबाईल चोरल्यानंतर तो दुसरा गुन्हा करण्यासाठी आला असता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. आनंद पाटील (वय ४६, रा. लांडगे नगर, भोसरी) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सुनीलकुमार नागोरे (वय २८, रा. आंबेठाण, खेड) यांनी फिर्याद दिली. नागोरे पत्नीला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. औषधे आणण्यासाठी ते वायसीएम रुग्णालयाच्या प्रवेशद्वारातून बाहेर आले होते. त्यावेळी आरोपीने त्यांचा २० हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यानंतर आरोपी पुन्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोर आल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

.....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW: टीम इंडियाच्या नारी शक्तीचा ऐतिहासिक विजय! ऑस्ट्रेलियाचा वन डे क्रिकेट इतिहासात असा पराभव कुणी केलाच नव्हता...

Archana Kute: 'ज्ञानराधा मल्टिस्टेट'च्या अर्चना कुटेंना पुण्यातून अटक; छाप्यात काय-काय सापडलं?

Nude Party: न्यूड पार्टीचे फोटो सोशल मीडियात व्हायरल; संशयित आयोजकांना अटक

PAK vs UAE Live: बिचारे... PCB ने खेळाडूंना तोंडावर पाडले, बॅगा घेऊन स्टेडियमवर पोहोचले; मॅच रेफरी Andy Pycroft च राहिले, टॉसही हरले

Latest Marathi News Updates: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT