पिंपरी-चिंचवड

‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियानाला प्रतिसाद

CD

पिंपरी, ता. १९ : ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ या अभियानार्तंगत आयोजित शिबिराला पिंपरी चिंचवडमध्ये चांगला प्रतिसाद मिळतो आहे. महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये तसेच दवाखान्यांमध्ये पहिल्या दोन दिवसांत आठ हजार ३०२ महिला, पुरुष, व बालकांनी आरोग्य तपासणी करून घेत उपचार घेतले.
या शिबिरांतर्गत महिलांसाठी, किशोरींसाठी व बालकांसाठी विविध आरोग्यविषयक सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. यामध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग, क्षयरोग व ॲनिमिया तपासणी, गर्भवती महिलांची तपासणी, हिमोग्लोबिन, तपासणी, पोषणविषयक समुपदेशन व लसीकरण यांचा समावेश आहे. तसेच किशोरींसाठी मासिक पाळी व पोषण विषयक सत्रांचे आयोजन करण्यात आले. या शिवाय आयुष्मान भारत डिजिटल मिशन, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व आयुष्मान वय वंदना कार्ड वितरण, निक्षय मित्र स्वयंसेवकांची नोंदणी व क्षयरुग्णांना पोषण आहारासाठी दत्तक घेण्यास प्रोत्साहन देण्यात आले. आवश्यकतेनुसार रुग्णांना रक्त, लघवी, सोनोग्राफी, एक्स-रे आदी तपासण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.
महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या नेतृत्वात व आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविले जात आहे. सदर शिबिरे मनपाच्या सर्व रुग्णालये व दवाखान्यांमध्ये २ ऑक्टोबरपर्यंत दररोज आयोजित केली जाणार आहेत.

महिलांचे आरोग्य हेच कुटुंब आणि समाजाच्या आरोग्याचे भांडार आहे. या अभियानाद्वारे महिलांना सर्वसमावेशक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. नागरिकांनी या शिबिरांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेऊन आपले आरोग्य तपासून घ्यावे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे
- शेखर सिंह, आयुक्त, पिंपरी चिंचवड नगरपालिका.

Asia Cup 2025: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा पुन्हा मुर्खपणा! ICC च्या ई मेलला अर्धवट उत्तर अन् विचारला उलट प्रश्न...

Banana Buns for Evening Snacks: संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी एकदम परफेक्ट! घरच्या घरीच बनवा बनाना बन्स

Uttar Pradesh : विश्वकर्मा योजनेत समाविष्ट झाले १२ नवीन ट्रेड्स, CM योगी म्हणाले UP आता विकासाचे ग्रोथ इंजिन होणार

‘या अली’ गाण्याचे गायक जुबिन गर्गचं निधन, सिंगापूरमध्ये स्कूबा डायव्हिंगदरम्यान मृत्यू, संगीतविश्वाला मोठा धक्का!

Latest Marathi News Updates : शेतकऱ्यांना मदत द्यावी ही सरकारला विनंती- मकरंद अनासपुरे

SCROLL FOR NEXT