सकाळ संवाद
भुयारी मार्गात पाण्यात
पावसामुळे सांगवी फाटा येथील ढोरे पाटील भुयारी मार्गात पाणी साचले. येथे पाण्याचा निचरा होईल अशी कोणतीही यंत्रणा नाही. साचलेल्या पाण्यातून बाहेर निघताना वाहनचालकांची तारांबळ उडाली. पाणी जाऊन मोठ्या प्रमाणावर वाहने बंद पडली, वाहनचालकांवर गॅरेज शोधण्याची वेळ आली. याठिकाणी एरवी वाहतूक पोलिस थांबलेले असायचे. पण, अशा स्थितीत एकही पोलिस नव्हता. तसेच महापालिका जलनि:स्सारण विभागाचा कोणी अधिकारी उपस्थित नव्हता.
- प्रदीप गायकवाड, नवी सांगवी
PNE25V51284
चेंबरचे उघडे झाकण धोकादायक
चिंचवडहून काळेवाडीकडे जाताना चित्तर व गणपतीसमोरील पदपथावरील चेंबरचे झाकण उघडलेले आहे. येथे अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी. तर, पालिका प्रशासनाने तातडीने नवीन झाकण बसवावे.
- रमेश देव, केशवनगर
PNE25V51285
पदपथाची आवश्यकता
थेरगाव चौकातून बिर्ला हॉस्पिटलकडे जाण्यासाठी डाव्या बाजूला पदपथच नाही. त्यामुळे गैरसोय सहन करावी लागत आहे. या परिसरात पदपथाची गरज आहे. येथील भंगार साहित्याच्या दुकानामुळे अडचणी वाढल्या आहेत.
- रमेश पाटील, थेरगाव
NE25V51286
पथदिवे बंदच्या तक्रारीकडे दुर्लक्ष
चऱ्होली येथील ताजने मळा परिसरातील मुख्य ९० मीटर रस्त्यावर बंद असलेल्या पथदिवे गेल्या काही दिवसांपासून बंद आहेत. यामुळे रहिवाशांना, विशेषतः संध्याकाळी आणि रात्रीच्या वेळी, अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. यामुळे अपघातांचा धोका आणि समाजकंटकांच्या कृत्यांचा धोका वाढतो. या समस्येची तक्रार यापूर्वी केली आहे, परंतु अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही.
- निर्गुण थोरे, चऱ्होली
PNE25V51289
नामफलकातून अक्षर निखळले
पिंपळे निलख येथील शहीद अशोक कामठे उद्यानातील बाहेरील बाजूच्या सीमाभिंतीवर ‘पिंपळे निलख’ हे नाव इंग्रजीत आहे. त्यातील एक अक्षर निखळले आहे. महापालिका प्रशासनाने हा फलक पूर्ववत करावा.
-गोविंद गायकवाड, पिंपळे निलख
PNE25V51290
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.