पिंपरी-चिंचवड

इंद्रायणी नदी सुधारला राज्याच्या समितीची मंजुरी

CD

पिंपरी, ता. १९ ः इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाच्या विकास आराखड्याला राज्य सरकारच्या नगरविकास विभागाच्या तांत्रिक समितीची (एसएलटीसी) मान्यता मिळाली आहे. त्यामुळे नदी सुधार प्रकल्पाचे काम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
केंद्र शासन पुरस्कृत अमृत २.० अभियानांतर्गत प्रकल्पासाठी अपर मुख्य सचिव (नगरविकास-२) यांच्या अध्यक्षतेखाली समितीची मुंबईत बैठक झाली. यात प्रकल्पाच्या आराखड्याला मान्यता देण्यात आली. प्रकल्पाला चालना देण्यासाठी आणि पर्यावरणप्रेमी व स्वयंसेवी संस्था प्रकल्पाचा सुधारित विकास आराखडा तयार करावा, यासाठी भाजप आमदार महेश लांडगे यांनी पाठपुरावा केला. त्यांनी विधानसभेच्या अधिवेशनामध्ये राज्य सरकारचे लक्ष वेधले होते. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आणि त्याआधी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे २०२२ मध्ये मागणी केली होती.
---------
इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पातून नदीसंवर्धन, पूरनियंत्रण, पाण्यावर प्रक्रिया आणि सौंदर्यीकरण असे चारही उद्देश साध्य होणार आहेत. हा एकूण ५२६ कोटींचा प्रकल्प आहे. अमृत २.० अभियानांतर्गत तो राबविला जाणार आहे. यात ४० आणि २० एमएलडीचे दोन प्रकल्प असतील.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
---
इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला राज्यस्तरीय तांत्रिक समितीची मान्यता मिळाली. यापूर्वी प्रशासकीय मान्यता देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकार्य केले. भाजप महायुती सरकारने पिंपरी-चिंचवडकरांना दिलेल्या शब्द खरा केला.
- महेश लांडगे, आमदार, भाजप, पिंपरी-चिंचवड
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur: मणिपूरमध्ये आसाम रायफल्सच्या जवानांवर हल्ला; दोन जवान हुतात्मा, छायाचित्रे व्हायरल

Nashik Kumbh Mela: सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी मंत्री समिती व शिखर समितीची स्थापना; नेत्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न

IND vs OMN Live: स्वप्न पाहिलेलं २००चं, पण...! Sanju Samson उभा राहिला; अभिषेक, तिलक, अक्षर यांचे योगदान; सूर्या आलाच नाही

‘माया’च्या निधनाने पोलिस अधिकारीही हळहळले! जर्मन शेफर्ड जातीचे श्वान होते सोलापूर शहर पोलिसांच्या बॉम्ब शोधक पथकाचा आधार; बॉम्ब शोधण्यात माया होती एक्स्पर्ट

Pune Water Issue : पाणी कपातीचा प्रस्ताव महापालिकेने धुडकावला; जॅकवेलच्या हस्तांतरणासही विरोध

SCROLL FOR NEXT