पिंपरी-चिंचवड

दोन वृद्ध महिलांना लुटणारे तिघे अटकेत

CD

पिंपरी, ता. १९ : दोन वृद्ध महिलांना चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या तीन आरोपींना पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा चारच्या पथकाने अटक केली. आरोपींकडून सोन्याचे १२७ ग्रॅम दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली मोटार असा एकूण १४ लाख १७ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
आबासाहेब मदने (वय ३५, रा. विकासनगर, देहूरोड), कैलास टोन्पे (वय ३२, रा. गायकवाड नगर, दिघी), वैभव सुर्यतळ (वय ३०, रा. लक्ष्मीनगर, रावेत) अशी आरोपींची नावे आहेत. सात सप्टेंबरला तीन अज्ञात व्यक्तींनी मुंबईला जाणाऱ्या दोन वृद्ध महिलांना मदतीच्या बहाण्याने मोटारीत बसवले. वाकड पुलापासून नवीन कात्रज बोगद्यापर्यंत त्यांना फिरविल्यानंतर आरोपींनी चाकूचा धाक दाखवून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने बळजबरीने काढून घेतले. दागिन्यांची किंमत आठ लाख ४७ हजार रुपये होती. याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला. गुन्ह्यात वापरलेल्या मोटारीची माहिती मिळवून १८ सप्टेंबरला पोलिसांनी वाल्हेकरवाडी, चिंचवड परिसरातून आरोपींना शिताफीने ताब्यात घेतले.
पोलिसांनी जप्त केलेल्या मोटारीची किंमत ५ लाख ७० हजार रुपये आहे. मदनेवर यापूर्वीही बारामती तालुका पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे.
------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur: मणिपूरमध्ये आसाम रायफल्सच्या जवानांवर हल्ला; दोन जवान हुतात्मा, छायाचित्रे व्हायरल

Nashik Kumbh Mela: सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी मंत्री समिती व शिखर समितीची स्थापना; नेत्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न

IND vs OMN Live: स्वप्न पाहिलेलं २००चं, पण...! Sanju Samson उभा राहिला; अभिषेक, तिलक, अक्षर यांचे योगदान; सूर्या आलाच नाही

‘माया’च्या निधनाने पोलिस अधिकारीही हळहळले! जर्मन शेफर्ड जातीचे श्वान होते सोलापूर शहर पोलिसांच्या बॉम्ब शोधक पथकाचा आधार; बॉम्ब शोधण्यात माया होती एक्स्पर्ट

Pune Water Issue : पाणी कपातीचा प्रस्ताव महापालिकेने धुडकावला; जॅकवेलच्या हस्तांतरणासही विरोध

SCROLL FOR NEXT