शालेय अभ्यासक्रमात ‘गणित’ विषय आणखी सहज-सोपा वाटावा, यासाठी शैक्षणिक व्हिडिओ निर्मितीतून अध्यापन करणाऱ्या उपशिक्षिका योगिता लहू सोनवणे यांचे कार्य अनेक शिक्षकांसाठी प्रेरणादायी ठरते आहे. महापालिका शाळा क्रमांक ९३ सोनवणे वस्ती शाळेत अध्यापन करणाऱ्या सोनवणे या महापालिकेच्या सामाजिक भावनिक व नैतिक शिक्षण विषयक स्पंदन कार्यक्रमात ‘मास्टर ट्रेनर’देखील आहेत.
योगिता सोनवणे यांनी आतापर्यंत ‘गणितातील मूलभूत संकल्पनांची ओळख’ यावर आधारित ४३, संख्यांची ओळख यासाठी हिंदी व मराठीतून २०, शिक्षकांसाठी व बालकांसाठी प्रेरणादायी गोष्टी या अंतर्गत ८६ व्हिडिओंची निर्मिती केली आहे. ‘एससीईआरटी’ने घेतलेल्या व्हिडिओनिर्मिती स्पर्धेत सोनवणे यांच्या गणितविषयक व्हिडिओला तालुकास्तरीय प्रथम बक्षीस मिळाले आहे.
‘मेंटॉर टीचर’- शिक्षक मित्रााची भूमिका बजावणाऱ्या सोनवणे या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी महापालिकेच्या पाच शाळा आणि जवळपास ४५ शिक्षकांना मदत करतात. प्रामुख्याने अध्ययन- अध्यापन प्रक्रियेत गुणवत्ता वाढीचे प्रयत्न, प्रशिक्षण साहित्य निर्मितीत त्यांचा सहभाग असतो. सुमारे १८ वर्षांच्या त्यांच्या अध्यापन कार्यात विद्यार्थी उपस्थिती वाढवण्यासाठी ‘सेल्फी विथ सुपरस्टार पॅरेंट’सारखा उपक्रमही त्या राबवत आहेत. यात ८५ टक्क्यांपेक्षा अधिक उपस्थिती असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना निकालाच्या दिवशी पदक प्रदान करण्यासह त्यांच्यासोबत ‘सेल्फी’ घेतला जातो. तसेच भेटवस्तू दिली जाते.
- अन्य शैक्षणिक उपक्रमांतही सहभाग
‘फ्युचर विद्या’ संकेतस्थळावरील शैक्षणिक कोर्ससाठी व्हॉइस ओव्हर
इयत्ता दुसरी इंग्रजी वर्कबुक लेखन सहभाग
बालचित्रवाणीसाठी इयत्ता पहिली व दुसरी साठी इंग्रजी पटकथा लेखन
शाळा व्यवस्थापन समिती प्रशिक्षण घटक संचनिर्मिती व प्रशिक्षणासाठी सहभाग
राज्यस्तरीय गीतमंच प्रशिक्षणात सहभाग तसेच जिल्हास्तरीय प्रशिक्षक
इतर मागास व बहुजन विकास विभागाच्या ‘गणित भीती की प्रेम’ पुस्तकाच्या लेखनात सहभाग
विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवित येत आहे. त्यांच्या सामाजिक-भावनिक विकासासाठी दररोज पाच ते सात मिनिटे ध्यानधारणा उपक्रम घेतला जातो. दरवर्षी वर्गाच्या गरजेनुसार आवश्यक शैक्षणिक साहित्य निर्मिती करण्याचा मी ध्यास बाळगून आहे.
- योगिता सोनवणे, उपशिक्षिका, सोनवणे वस्ती शाळा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.