दुकानदाराला मारहाण करून लूट; तिघांना अटक
पिंपरी : पिंपरीतील नेहरूनगर येथे एका दुकानदाराला मारहाण करून दुकानातील रोकड व इतर माल लुटल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
या प्रकरणी आशिषकुमार प्रसाद (रा. नेहरुनगर, पिंपरी) यांनी संत तुकाराम नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अभिषेक अलंकुटे (वय २०, रा. गंधर्वनगरी, मोशी), ईश्वर गायकवाड (वय २०, रा. विठ्ठलनगर, पिंपरी) आणि अभिजीत कदम (वय २१, रा. चोविसावाडी, चऱ्होली) यांना अटक केली आहे. फिर्यादी त्यांचे चहाचे दुकान उघडत असताना आरोपींनी त्यांच्याकडे माचिस पेटीची मागणी केली. त्यानंतर त्यांनी फिर्यादीला शिवीगाळ करीत दगड मारून जखमी केले. एका आरोपीने दुकानातील एक हजार २०० रुपये आणि सिगारेटची पाकिटे असा एकूण दोन हजार ६०० रुपयांचा माल जबरदस्तीने घेतला. आम्ही येथील भाई आहोत, आमच्या नादाला लागल्यास त्याची अशी अवस्था करू, अशी धमकी देत दहशत निर्माण केली.
कोयता बाळगल्याप्रकरणी एकाला अटक
पिंपरी : बेकायदारित्या कोयता बाळगल्याप्रकरणी एका तरुणाला पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिटच्या पथकाने अटक केली. ही कारवाई चिखली येथे स्मशानभूमीजवळील रस्त्यावर करण्यात आली.
आदित्य जाधव (वय १९, रा. पाटीलनगर, चिखली, पुणे, मूळ-परळी, जि. बीड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीने त्याच्याजवळ बेकायदारित्या कोयता बाळगला. याबाबत माहिती मिळाली असता गुन्हे शाखेने त्याला ताब्यात घेऊन कोयता जप्त केला.
क्रिकेट बेटिंग प्रकरणी दोघांवर कारवाई
पिंपरी : बांगलादेश विरुद्ध श्रीलंका या क्रिकेट सामन्यावर पिंपरी कॅम्प येथे ऑनलाईन बेटिंग घेणाऱ्या दोघांवर पोलिसांनी कारवाई केली.
गिरीश इसरानी (वय ३१), विकी इसरानी (वय ३१, दोघेही रा. रिव्हर रोड, पिंपरी) अशी कारवाई केलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपी हे लॅपटॉप-मोबाईलच्या साहाय्याने ‘आशिया कप २०२५’ मधील क्रिकेट सामन्यावर ऑनलाईन बेटिंग घेताना आढळून आले. दोघांनाही ताब्यात घेऊन त्यांच्यावर महाराष्ट्र जुगार कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.