‘डीजे’ची दखल घ्या
यंदाच्या नवरात्री उत्सवात पिंपरी चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रात गणेशोत्सवासारखी डीजेवर बंदी वगैरे काही लावली आहे असे दिसत नाही. कारण, डीजेचा दणदणाट सुरू झाला आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक, रुग्ण व्यक्ती आणि विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास होतो आहे. कोणी याची दखल घेईल का ?
- सुधाकर जोंधळे, किवळे