पिंपरी-चिंचवड

कामगार विमा महामंडळाला अखेर जाग

CD

‘ ’
लोगो
सकाळ इम्पॅक्ट

पिंपरी, ता. २६ ः गेल्या सुमारे तीन दशकांपासून दुर्लक्षित असलेल्या मोहननगर येथील कर्मचारी राज्य विमा रुग्णालयातील (ईएसआय) सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी कर्मचारी राज्य विमा महामंडळाने (ईएसआयसी) अखेर पावले टाकली आहेत. ‘सकाळ’ने या रुग्णालयाचा गरजू रुग्णांना उपयोग होत नसल्याच्या प्रश्नाला वाचा फोडणारी ‘ईएसआयचं दुखणं’ ही वृत्तमालिका नुकतीच प्रसिद्ध केली होती. यानंतर ‘ईएसआयसी’ला खडबडून जाग आली.
या रुग्णालयात गुणवत्तापूर्ण उपचार देण्यासाठी तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारीही नेमण्यात येत आहेत. याशिवाय आवश्यक चाचण्यांसाठी यंत्रसामग्री महिनाभरात बसविण्यात येईल.
हे रुग्णालय केंद्र व राज्य सरकारच्या निधीतून उभारले जाते, मात्र राज्य सरकारच्या दुर्लक्षाचा कामगारांना फटका बसला आहे. हे कामगार तुटपुंज्या वेतनावर दहा ते बारा तास घाम गाळतात. आर्थिक स्थितीला मर्यादा असूनही त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात पैसे मोजावे लागतात किंवा महापालिका रुग्णालयात उपचार घेणे भाग पडते. ग्रामीण भागातून आलेल्या रुग्णांना वेळेत उपचार न मिळाल्यामुळे अनेकदा परत जावे लागते. अनेकांना एक्स-रे, सीटी स्कॅन आणि रक्त तपासण्या बाहेरून कराव्या लागतात. हे सर्व प्रश्न ‘सकाळ’ने मांडले होते.

-------
या विभागात तज्ज्ञांची नियुक्ती
- दंतरोग ः तज्ज्ञ डॉक्टरांसह आवश्यक तांत्रिक साधनसामग्री उपलब्ध करण्यात आल्याने येत्या १५ दिवसांत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब होणार
- कर्करोग ः तज्ज्ञ डॉक्टर नेमले गेल्याने बायोप्सी, रक्ततपासणी, स्कॅन व एक्स-रे या चाचण्यांच्या आधारे उपचारांची दिशा ठरविणे शक्य, त्यानुसार शस्त्रक्रिया, केमोथेरपी, रेडिओथेरपी किंवा इम्युनोथेरपीसारखे उपचारांचे नियोजन होणार
मूत्रपिंड ः मूत्रपिंडाशी संबंधित आजारांसाठीही तज्ज्ञ नेमल्याने डायलिसिसचे व्यवस्थापन, उच्च रक्तदाब व मधुमेहामुळे होणाऱ्या मूत्रपिंड विकारांवर उपचार, मूत्रपिंड प्रत्यारोपणाबाबत मार्गदर्शन देणे सुलभ
-------
हृदयविकार तज्ज्ञांची नेमणूक लवकरच
लवकरच हृदयविकार तज्ज्ञांची नेमणूकही केली जाईल. त्यामुळे छातीत दुखणे, धडधड, हृदयविकाराचा झटका किंवा ब्लॉकेज यांसारख्या आजारांचे निदान व उपचार करता येतील. अॅंजिओप्लास्टी, स्टेंट बसवणे किंवा बायपास शस्त्रक्रियेसाठी मार्गदर्शन मिळेल, तसेच उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉल व मधुमेहामुळे होणाऱ्या हृदयरोगांवर नियंत्रण ठेवण्याची सोय होईल.
--------

महिनाभरात ही यंत्रणा
- डायलिसिस मशिन ः मूत्रपिंड नीट काम करत नसल्यास रक्त शुद्ध करण्याचे उपचार
- एमआरआय मशिन ः चुंबकीय लहरी वापरून शरीराच्या आतील अवयवांची तपासणी
- कॅथलॅब मशिन ः हृदय व रक्तवाहिन्यांमधील ब्लॉकेज कळते, अँजिओग्राफी किंवा अँजिओप्लास्टीसाठी उपयोग
- ऑटो अॅनलायझर ः रक्तातील साखरेचे प्रमाण, कोलेस्टेरॉल, युरिया, क्रिएटिनिन, यकृत, मूत्रपिंड, लिपिड प्रोफाइल, हार्मोन टेस्ट आदी जैवरासायनिक तपासण्या
- इलेक्ट्रोलाईट अॅनलायझर ः रक्तातील सोडियम, पोटॅशियम, क्लोराईड, कॅल्शियम, बायकार्बोनेट यांचे प्रमाण मोजते.
----------
सध्या रुग्णालयात कर्करोग, मूत्रपिंडरोग तज्ञ, ह्रदयरोग तज्ञ उपलब्ध आहेत. आयसीयू पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाले आहे. प्रयोगशाळेत अत्याधुनिक ऑटो अॅनालायझर आणि इलेक्ट्रोलाईट अॅनलायझर उपलब्ध झाले आहे. लवकरच या सुविधा कार्यान्वित होतील. ‘ईएसआय’शिवाय, प्रधानमंत्री आयुष्मान भारत आणि महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या लाभार्थ्यांनी रुग्णालयातील
उपचारांचा लाभ घ्यावा.
- डॉ. वर्षा सुपे - चिकित्सा अधीक्षक, ईएसआय रुग्णालय, मोहननगर
----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalu Prasad Yadav Shock : लालू प्रसाद यादव यांना जबरदस्त झटका! ; कुटुंबातील आणखी एका सदस्याने पक्ष अन् घरही सोडलं

IPL 2026 Retentions: मुंबई इंडियन्सकडून अर्जुन तेंडुलकर ट्रेड, तर विग्घ्नेश पुथूरसह 'हे' खेळाडू रिलीज; पाहा संपूर्ण लिस्ट

Viral Video : मॅगी खाल्ल्यावर भांडे कोण धुणार? चार मित्रांमध्ये वाद, AI ने दिला निकाल; ऐकून तुम्हालाही हसू आवरणार नाही, पाहा व्हिडिओ

Sharad Pawar : बिहारच्या निवडणुका खरोखरीच पारदर्शक झाल्यात का; शरद पवार यांचा सवाल!

Latest Marathi Live News Update : मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आज दादर शिवतीर्थ येथे मनसेची महत्वाची बैठक

SCROLL FOR NEXT