पिंपरी, ता. २७ ः दिघीमधील उत्तर पश्चिम भागामध्ये दररोज सकाळी वीजपुरवठा खंडित होत आहे. याविषयी दिघीकर विकास प्रतिष्ठानच्या वतीने महावितरण भोसरी विभागाचे कार्यकारी अभियंता अतुल देवकर यांना निवेदन दिले.
दिघीकर विकास प्रतिष्ठानच्या वतीने रवी चव्हाण, अतुल रुणवाल, अरुण बोटे, आशिष बोटे महावितरणच्या कार्यालयात जाऊन दिघीकरांच्या वतीने सतत होत असलेल्या वीजपुरवठा खंडित बद्दल तक्रार अतिरिक्त कार्यकारी अभियंता मोहन दामावले उपस्थित होते. दिघीमधील उत्तर पश्चिम या भागामध्ये रोज सकाळी महत्त्वाच्या वेळी वीजपुरवठा खंडित होतो. त्यासंदर्भात इतर गोष्टींवर एक तास चर्चा केली. कळस