दापोडीत साडेसोळा लाखांची फसवणूक
पिंपरी : गुंतवणुकीवर नफा देण्याचे आमिष दाखवून एकाची साडेसोळा लाखांची फसवणूक करण्यात आली. ही घटना दापोडी येथे घडली. या प्रकरणी दापोडी येथील ५१ वर्षीय व्यक्तीने दापोडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी यांना ऑनलाइन शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली एका व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सामील करून घेत एक खाते उघडण्यास सांगितले. त्या खात्यावर ट्रेडिंगसाठी पैसे जमा करायला सांगून सुरुवातीला नफा मिळाल्याचे भासवले. त्यानंतर गुंतवणुकीतून जमा झालेले पैसे न देता आणखी पैसे भरायला लावले. यामध्ये फिर्यादीची १६ लाख ५० हजारांची आर्थिक फसवणूक केली.
इमारतीवरुन पडून कामगाराचा मृत्यू
पिंपरी : इमारतीच्या चौदाव्या मजल्यावरून पडल्याने कामगाराचा मृत्यू झाला. याप्रकरणी संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना चिखली प्राधिकरण परिसरातील रॉयल हेरिटेज इमारत येथे घडली.
दयाल रजित सिंग (वय १८, रा. जि. बक्सा, आसाम) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. या प्रकरणी त्याचा चुलत भाऊ गोविंदा शंभु सिंगा (रा. सेक्टर क्र. १३, चिखली) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ठेकेदार भरत विठ्ठल चव्हाण (रा. शुभांगण सोसायटी, चिखली) याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. चिखली प्राधिकरण परिसरातील रॉयल हेरिटेज इमारतीच्या चौदाव्या मजल्यावर सुरू असलेल्या सेट्रिंगच्या कामावेळी ठेकेदार चव्हाण याने दयाल याला आवश्यक ती सुरक्षेची साधने न देता काम करण्यास सांगितले. त्याचवेळी त्याचा तोल जाऊन तो खाली पडला.
गांजा बाळगल्याप्रकरणी तिघांना अटक
पिंपरी : बेकायदा गांजा बाळगल्याप्रकरणी तिघांना गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने अटक केली. ही कारवाई पिंपरीतील निराधारनगर झोपडपट्टी परिसरात करण्यात आली. शाहरुख अख्तर शेख (वय ३०, रा. तळेगाव), सचिन साहेबराव जगताप (वय ४७, रा. मोरेवस्ती, चिखली) आणि गणेश बाळू थोरवे (वय ३५, रा. उर्से अंबेवाडी, मावळ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. अटक केलेल्या तीन आरोपींकडून ९४ हजार ३०० रुपयांचा १ किलो ८८६ ग्रॅम गांजा तसेच ५ लाख रुपयांची मोटार जप्त करण्यात आली.
पिंपरीत तरुणाकडून गांजा जप्त
पिंपरी : भाटनगर येथील इमारतीत पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने छापा टाकून एका तरुणाला गांजासह अटक केली. त्याच्याकडून गांजा जप्त केला. उज्वल राजू सपकाळ (वय २७, रा. भाटनगर, पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून ४२ हजार ५०० रुपयांचा ८४२ ग्रॅम गांजा जप्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.