पिंपरी-चिंचवड

थोडं थांबा, येतेय घर घेण्याची सुवर्णसंधी

CD

पिंपरी, ता. २९ ः भाड्याच्या घरात राहताना येणारा कंटाळा, घरमालकाची मनधरणी, सतत वाढणारे भाडे आणि त्यासाठी करावी लागणारी तडजोड...यामुळे त्रासला असाल ना? या सर्वांतून तुमची सुटका करण्यासाठी सकाळ माध्यम समूह घेऊन येत आहे, स्वतःचं घर घेण्याची सुवर्णसंधी. त्यासाठी थोडा संयम ठेवलात तर खरोखर या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल. येत्या शनिवारी म्हणजेच चार ऑक्टोबरपासून चऱ्होलीत वास्तू एक्स्पो सुरू होत आहे.
या एक्स्पोमध्ये अनेक बांधकाम व्यावसायिक सहभागी होणार आहेत. त्यामुळे आपल्या स्वप्नातले घर निवडून ते त्वरित बुक करता येणार आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील सोयीसुविधांमुळे नागरिकांचा येथे राहण्यासाठी ओघ वाढला आहे. भाडेतत्त्वावर राहणाऱ्या कुटुंबांसह पुणे तसेच भागांतील नागरिकही उद्योगनगरीला पसंती देत आहेत.
आमची मुले शहरात शिकतात, शिक्षणानंतर ते तेथेच स्थायिक होणार आहेत, त्यामुळे आम्ही गावाकडे थांबून काय करणार...अशा विचाराने आणि भविष्याची गुंतवणूक म्हणून अनेकजण येथे घर घ्यायला पसंती देत आहेत. मात्र, शहराचा मोठा विस्तार आणि एकाच दिवशी अनेक गृहप्रकल्पांना भेटी देऊन माहिती घेणे अशक्य असते. त्यामुळे इच्छा असूनही अनेकजण घराचा शोध घेऊ शकत नाहीत. त्यांच्यासाठी ‘सकाळ’ने चांगला पर्याय आणला आहे. एकाच ठिकाणी अनेक गृहप्रकल्पांची माहिती मिळणार आहे. त्यासाठी शनिवारी (ता. ४) आणि रविवारी (ता. ५) ‘सकाळ’च्या ‘वास्तू एक्स्पो’ला भेट द्या. चांगल्या घराच्या शोधात असाल, मनासारखं आणि परवडणारं घर हवं असेल, तर आजच आपली वेळ राखून ठेवा आणि ‘सकाळ’च्या वास्तू एक्स्पोला भेट देऊन दसरा-दिवाळीच्या मुहूर्तावर हक्काचं घर ‘बुक’ करा!
---

‘वास्तू एक्स्पो’ची वैशिष्ट्ये
- वन बीएचकेपासून थ्री बीएचकेपर्यंत घरे
- कमर्शिअल आणि एनए प्लॉटसुद्धा
- वीसपेक्षा जास्त बांधकाम व्यावसायिकांचे शंभरपेक्षा जास्त प्रकल्प
- एकाच छताखाली अनेक गृहप्रकल्पांची माहिती

काय? कुठे? कधी? केव्हा?
काय? ः ‘सकाळ’ वास्तू एक्स्पो
कुठे? ः चंद्रफूल गार्डन, आळंदी-पुणे पालखी मार्ग, वडमुखवाडी, चऱ्होली
कधी? ः शनिवार (ता. ४ ऑक्टोबर) आणि रविवार (ता. ५ ऑक्टोबर)
केव्हा? ः सकाळ ११ ते रात्री ८
स्टॉल बुकिंगसाठी संपर्क ः ९८८१७१८८४०
-------

आपला जेनेसिस हा सर्वात उंच टॉवर आहे. कामाचा दर्जा आणि सोयीसुविधा देण्यात तडजोड न केल्यामुळे एका दिवसांत १२० युनिटची विक्री झाली. ग्राहकांच्या आयुष्यात आनंदाचा प्रकाश पडावा या उद्देशाने आम्ही प्रत्येक घरामध्ये स्वतंत्र इनव्हर्टर देतोय. विमानतळ, बीआरटी, देहू-आळंदी तीर्थस्थळांजवळच आपला प्रकल्प येतो. येथून काही मिनिटांत पुणे, पिंपरी-चिंचवड, हिंजवडी आयटी पार्कसह कोणत्याही ठिकाणी पोहोचता येते. या ठिकाणाला ग्राहकांनी उज्ज्वल भविष्यासाठी पसंती द्यावी.
- विवेक साह, सहसंचालक, सॅंटियागो रिअॅल्टी
-------

चऱ्होली येथे नवीन आयटी पार्क होत असल्यामुळे भविष्यात नोकरीची संधी आहे. देहू-आळंदी तीर्थस्थळे जवळच आहेत. येथून केवळ दहा मिनिटांत लोहगाव येथील विमानतळावर पोहोचता येते. येथे सुसज्ज रस्त्यांचे जाळे तयार आहे. येथून वीस मिनिटांत कुठेही जाणे शक्य आहे. भविष्यात आळंदी मेट्रोचा प्रस्ताव नियोजित आहे. नवीन पिढीचा भविष्याचा विचार करता या भागात घर घेणे सोयीचे ठरणार आहे.
- गणेश कुटे, संचालक, कीज रिअॅल्टी
-------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI: भारताविरूद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी विंडीजला आणखी दुसरा मोठा धक्का; टीममध्ये केला बदल

२ तारखेला सोलापूर शहरातील वाहतूक मार्गात बदल! विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिनी पारंपारिक वाद्याच्या गजरात निघणार मिरवणुका; ‘डीजे’ला बंदी, पोलिस आयुक्तांचे आदेश

Career Horoscope 30th Sept: उद्या गजकेसरी राजयोग! मान-सन्मान आणि यशाची दारे उघडणार; 'या' राशींचे करिअर झेपावणार

Godavari River Flood : गोदामाय कोपली! गेवराईतील ३२ गावातील दोन हजारांहून अधिक कुटूंबियाचे स्थलांतर

SSC HSC Exam Form : दहावी-बारावीच्या खासगी विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणीसाठी १५ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

SCROLL FOR NEXT