पिंपरी-चिंचवड

उपेक्षित कामगारांना रोजगारासह सुविधांची प्रतीक्षा

CD

पिंपरी, ता. ७ : ‘‘आज तरी काम मिळेल’’ या आशेने सकाळी सातच्याच सुमारास जेवणाचा डबा घेऊन शेकडो कामगार दररोज मजूर अड्ड्यावर उभे राहतात. त्यापैकी फक्त दोन-तीनशे जणांनाच काम मिळते; उरलेल्यांना दुपारपर्यंत उन्हात उभे राहून, रिकाम्या हाती आणि उदास मनाने परतावे लागते. अशी परवड होत असतानाही या अड्ड्यांवर पिण्याचे पाणी, सावलीदेखील या कष्टकऱ्यांच्या नशिबी नसल्याचे चित्र दिसते.

शहरातील मजूर अड्ड्यांवर कामाच्या प्रतीक्षेत उभ्या असणाऱ्या कामगारांची सरकारकडे नोंदच नाही. औद्योगिक कौशल्य नसल्यामुळे मजूर अड्ड्यांवर मोठ्या प्रमाणात हा वर्ग काम मागत उभा असतो. शहरात लाखभर बांधकाम मजूर, कामगार असतील. त्यामध्ये परप्रांतीय कामगार सर्वाधिक आहेत. ८० टक्के स्थानिक कामगारांना रोजगार द्यावा, असा नियम आहे. परंतु, त्याला शासकीय बंधन नसल्यामुळे नियमाचे पालन होत नाही. अशा कामगारांना शासनाने ओळखपत्र किंवा इतर ओळखीचा पुरावा दिलेला नाही. त्यामुळे मजुरांची नेहमीच परवड सुरू असते.
अंगमेहनतीची कामे करणाऱ्या अशा नाका कामगारांना सुविधा देण्यासाठी असंघटित कामगार कल्याण महामंडळाद्वारे नोंदणी केली जाते. पण, बहुतांश जणांची नोंदणीच नसल्यामुळे सुविधा मिळत नसल्याची खंत या कष्टकऱ्यांना आहे. या मजुरांना सेफ्टी शूज, हॅण्डग्लोव्हज, गॉगल आदी सुरक्षा साधने दिली जात नाहीत. काही ठिकाणी मिळतात; पण ती निकृष्ट असतात, असे कामगार सांगतात.

- शहरातील मजूर अड्डे
डांगे चौक, थेरगाव
रहाटणी फाटा, काळेवाडी
पीडब्ल्यूडी मैदान, सांगवी
वाल्हेकरवाडी
कृष्णानगर, चिखली
देहू-आळंदी रस्ता, मोई फाटा
भूमकर चौक, वाकड

- मजूर अड्ड्यांवर या सुविधांची अपेक्षा
निवारा शेड
पिण्यासाठी पाणी
आरोग्य सुविधा
मार्गदर्शनासाठी मदतकक्ष
महिला कामगारांसाठी सुरक्षा व्यवस्था
समुपदेशन केंद्र

सकाळी सात वाजता अड्ड्यावर आल्यावर कधी काम मिळते, तर कधी नाही. उशिरापर्यंत काम मिळाले नाही, तर २०० रुपये मजुरीवर रात्री नऊ-दहा वाजेपर्यंत काम करावे लागते. पावसात उभे राहून पुन्हा कामावर जायला नको वाटते. पण, पोट कोण भागवणार? पावसाळा आणि उन्हाळ्यात तेथे उभे राहणेही नको वाटते.
- मुरली शिंगाडे, मजूर

पती, मुली आणि मी आम्ही सर्वजण दररोज मिळेल ते काम करतो. घराची साफसफाई, बांधकामावर ओझे वाहणे, खोदकाम अशी मिळेल ती कामे करतो. सकाळी लवकर उठून भाकरी बांधून मजूर अड्ड्यावर येतो. येथे पिण्याच्या पाण्याचीही सोय नाही, पावसात उभे राहावे लागते. काम मिळाले नाही, तर घरी जातो.
- शोभा आकाडे, मजूर

PNE25V58078

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni: कॅप्टनकूल आता 'ड्रोन पायलट'! CSK ला सोडून मुंबई इंडियन्समध्ये एन्ट्रीच्या चर्चेदरम्यान धोनीचे नवे ट्रेनिंग पूर्ण

Ausa Accident : बहिणीला कॉलेजला सोडताना बहीण भावावर काळाचा घाला; कारच्या धडकेने भावंड ट्रकखाली सापडून जागीच मृत्यू

Latest Marathi News Live Update : पंढरपूर: वारकऱ्यांना मारहाण, दोघांना अटक

इन्स्टाग्रामवर रिल्स अन् फोटो शेअर करताय? मग तुम्हालाही मिळू शकतो ‘Insta Rings’ पुरस्कार, काय आहे प्रोसेस? पाहा एका क्लिकवर

मी चित्रपट पाहिला नाही पण... मराठी 'दशावतार'च्या 'कांतारा'सोबत होणाऱ्या तुलनेवर नेमकं काय म्हणाला रिषभ शेट्टी?

SCROLL FOR NEXT