पिंपरी-चिंचवड

समाज विकास विभागाच्या योजनांसाठी स्वतंत्र वेबपेज

CD

पिंपरी, ता. ८ : समाज विकास विभागाच्या योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहचावा, यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने आपल्याच संकेतस्थळावर स्वतंत्र वेबपेज सुरू केले आहे. त्याचे उद्घाटन मावळते आयुक्त शेखर सिंह यांनी नुकतेच केले.
नव्याने तयार करण्यात आलेल्या https://www.pcmcindia.gov. in/samaj_vikas या वेबपेजच्या माध्यमातून नागरिकांना समाज विकास विभागाच्या सर्व योजनांची माहिती, त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी, अर्ज प्रक्रिया तसेच विभागाने राबविलेले उपक्रम याविषयी संपूर्ण माहिती मिळणार आहे.
सर्व लाभार्थी ऑनलाइन अर्ज करू शकतात आणि पात्र लाभाची रकम थेट त्यांच्या बॅंक खात्यात जमा होणार आहे. समाज विकास विभागामार्फत विविध लोककल्याणकारी योजना राबविल्या जातात. यामध्ये महिला व बालकल्याण, दिव्यांग कल्याण, मागासवर्गीय कल्याण योजना आणि इतर अनेक उपयोजना यांचा समावेश आहे. या सर्व योजनांमधून पात्र लाभार्थ्यांना आवश्यक मदत, सुविधा दिले जातात. या सर्व योजना व उपक्रमांची माहिती नागरिकांना अधिक सुलभतेने उपलब्ध व्हावी, तसेच अर्ज प्रक्रियेत पारदर्शकता व वेग वाढावा यासाठी समाज विकास विभागाचे हे स्वतंत्र वेबपेज तयार करण्यात आले आहे.
या वेबपेजच्या लोकार्पणावेळी अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे मुख्य लेखापरीक्षक प्रमोद भोसले, सह आयुक्त मनोज लोणकर, नगर सचिव मुकेश कोळप, समाज विकास विभाग उपायुक्त ममता शिंदे आदींच्‍या उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : उपचाराच्या नावाखाली डॉक्टरकडून लैंगिक अत्याचार व खंडणी; आरोपीस २५ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी!

BIGG BOSS MARATHI 6: स्वर्ग पाहाल की नर्क? 'बिग बॉस मराठी ६'ची धमाकेदार घोषणा; कोण करणार सूत्रसंचालन

Raj Thackeray’s Emotional Tribute to Dharmendra : ... पण याला अपवाद म्हणजे धर्मेंद्रजी – राज ठाकरेंची भावनिक पोस्ट!

Anna Hazare : राळेगणसिद्धीत अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘लोक आंदोलन ग्लोबल पीस फाउंडेशन’ची नवी दिशा!

Latest Marathi News Live Update : धाराशिवमध्ये भाजप आणि शिंदे सेनेमध्ये तणाव

SCROLL FOR NEXT