पिंपरी-चिंचवड

नाव दुरुस्तीसाठी मुदत देऊनही दुर्लक्ष

CD

पिंपरी, ता. २८ : राज्याच्या कला संचालनालयाने शासकीय रेखाकला (इंटरमिजिएट व एलिमेंटरी ड्रॉइंग ग्रेड २०२४ ) परीक्षेचा निकाल जानेवारीत जाहीर करण्यात आला होता. यानंतर काही विद्यार्थ्यांच्या नावामध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत. कला संचालनालयाने दोनवेळा मुदतवाढ देऊनही त्रुटी दुरुस्ती करण्यात आल्या नाहीत.
कला संचालनालयतर्फे शासकीय रेखाकला परीक्षा घेण्यासाठी विद्यार्थ्यांची माहिती ऑनलाइन भरावी लागते. विद्यार्थ्यांचे नाव, जन्मतारीख हा तपशील भरावा लागतो. त्या दरम्यान नावात चूक झाल्यावर उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्रावर तशीच माहिती प्रसिद्ध होत आहे. विद्यार्थ्यांच्या नावामध्ये त्रुटी झाल्याची ही बाब निकाल जाहीर झाल्यानंतर समोर आल्यावर त्रुटींच्या दुरुस्तीसाठी ऑनलाइन पद्धतीने केंद्र प्रमुखाच्या लॉग इनवरून ३१ जानेवारी २०२५ मुदत देण्यात आली होती. याबाबत
महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ संचालक विनोद दांडगे यांनी दिली.

१५ एप्रिलपर्यंत करा दुरुस्ती
कलाध्यापकांच्या मागणीवरुन राज्य कला शिक्षण मंडळाने पुन्हा ही तारीख वाढवून १५ एप्रिल केली आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या नावात त्रुटी असेल, त्यात दुरुस्ती करण्यासाठी लॉग-इनवर टॅब देण्यात आला आहे. त्यासाठी शंभर रुपये शुल्क भरावे लागणार आहे.

आता १५ एप्रिलनंतर तारीख पुन्हा वाढवून मिळणार नाही, याची शक्यता लक्षात घेऊन कलाध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या नावातील त्रुटींच्या दुरुस्ती वेळेत करुन घेणे हिताचे आहे. ही दुरुस्ती वेळेत केली नाही तर ही लिंक बंद होईल आणि त्यानंतर मात्र काहीही करता येणार नाही. परिणामी नावात दुरुस्ती असलेल्या विद्यार्थ्यांना चुकीच्या नावांची प्रमाणपत्रे मिळतील. त्यातून भविष्यात अडचणी निर्माण होतील.
- श्रावण जाधव, संस्थापक, पुणे जिल्हा कलाध्यापक कला परिषद

सप्टेंबर २०२४ च्या ग्रेड परीक्षेमधील ज्या विद्यार्थ्यांचे नावात दुरुस्ती आहे, त्यांनी चित्रकला ग्रेड प्रमुखाच्या केंद्र प्रमुखांच्या लॉग-इनवरून शंभर रुपये ऑनलाइन शुल्क भरून नाव दुरुस्त करून घ्यावे. ही संधी पुन्हा मिळणार नाही.’’
- सतीश क्षीरसागर, कलाशिक्षक, प्रियदर्शनी स्कूल, इंद्रायणीनगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra HSC Result 2026 : बारावीचा निकाल आज जाहीर होणार! दुपारी 1 वाजल्यापासून 'या' अधिकृत लिंकवर पाहता येईल रिझल्ट, यंदा कोण मारणार बाजी?

RBI New Rules 2026 : क्रेडिट कार्ड, यूपीआय ते एटीएम; १ मेपासून काय बदललं? थेट खिशावर परिणाम

IPL 2026: मुंबई इंडियन्स vs चेन्नई सुपर किंग्स; करो या मरो सामना, रोहित धोनी चर्चेत, पण प्रत्यक्षात कोण खेळणार? पाहा कशी असेल Playing XI

Maharashtra Weather Update : कोकणात ढगाळ तर विदर्भात विजांचा कडकडाट! मे महिन्याच्या सुरुवातीलाच वरुणराजाची एन्ट्री; काय सांगतोय IMD चा अंदाज?

Software Engineer Privacy : भाड्याच्या घरात आंघोळ करणाऱ्या 23 वर्षीय सॉफ्टवेअर अभियंता तरुणीचा गुप्तपणे काढला व्हिडिओ; 30 वर्षीय MBA पदवीधराचं घृणास्पद कृत्य

SCROLL FOR NEXT