पिंपरी-चिंचवड

कुदळवाडीत बांगलादेशी महिला जेरबंद

CD

पिंपरी, ता. २८ : पर्यटन व्हिसावर आलेल्या बांगलादेशी महिलेने चिखलीतील वेल्डिंग व्यावसायिकासोबत घरोबा केला. यातून त्याने तिला आश्रय दिला. या महिलेसह पतीला चिखली पोलिसांनी अटक केली. तिच्या सतरा वर्षीय मुलालाही ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई चिखलीतील कुदळवाडी येथे करण्यात आली.

मोहम्मद राणा मोहम्मद सलाम शेख (वय ३३, रा. तळवडे गावठाण, मूळ - उत्तर प्रदेश) आणि बांगलादेशी घुसखोर महिला (वय ३०) यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘‘ही महिला २०१५ पासून भारतात पर्यटन व्हिसावर येत-जात होती. तिचा पहिला पती बांगलादेशात राहतो. दरम्यान, तिची उत्तर प्रदेशातील मोहम्मद राणा याच्याशी सोशल मीडियावर ओळख झाली. डिसेंबर २०२१ मध्ये तिने पुन्हा पर्यटन व्हिसा काढला आणि मोहम्मद याला भेटण्यासाठी ती चिखली येथे आली. पहिल्या पतीपासूनचा अल्पवयीन मुलगाही तिच्या सोबत होता. ही महिला बांगलादेशी आहे, हे माहिती असतानाही मोहम्मदने २०२१ मध्ये तिच्याशी लग्न केले. त्यांना आता सव्वा वर्षांचा मुलगा आहे. महिलेची पर्यटन व्हिसाची मुदत ७ एप्रिल २०२२ रोजी संपली. त्यानंतर महिलेला बांगलादेशात पाठवणे आवश्यक असताना मोहम्मदने तिला आश्रय दिला.’’ याबाबत माहिती मिळाल्यानंतर चिखली पोलिसांनी महिलेसह मोहम्मदला अटक केली. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक राम गोमारे करीत आहेत.

पासपोर्ट जाळला, आधार कार्ड बनावट
आपण बांगलादेशी असल्याचे कोणाला समजू नये, यासाठी महिलेने स्वत:चा आणि मुलाचा बांगलादेशी पासपोर्ट जाळून नष्ट केला. तसेच भारतीय असल्याचे भासविण्यासाठी बनावट कागदपत्रांच्या आधारे त्यांचे आधार, पॅनकार्ड आणि मतदान ओळखपत्रही बनवून घेतल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

पोलिस ठाण्याच्या स्थापनेपासून चिखली हद्दीत पहिल्यांदाच बांगलादेशी व्यक्ती सापडला आहे. या आरोपींकडे लग्न केल्याबाबतची कोणतीही कागदपत्रे नाहीत. तसेच इतरही तपास केला जात आहे.
- विठ्ठल साळुंखे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Officers Transfers: महाराष्ट्रात पोलीस दलात मोठा फेरबदल! २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदली; कुणाची कुठे नेमणूक? जाणून घ्या यादी...

IPL 2026 Point Table: गुजरात टायटन्सने विजय मिळवून PlayOff ची चुरस अधिक रंजक बनवली; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर सहज मात

HSC Result: मोठी बातमी! महाराष्ट्र बोर्डाच्या १२वी निकालाची तारीख जाहीर, कधी आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या संपुर्ण प्रक्रिया

GT vs RCB Live: एवढा राग...! शुभमन गिलची कॅच घेतल्यावर विराट कोहलीने काय केलं? त्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती Video Viral

Pune News : पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर; पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणमधील ३२ अधिकारी, अंमलदारांचा समावेश

SCROLL FOR NEXT