पिंपरी-चिंचवड

‘गिरीप्रेमी’ कडून तीन दिवसांत आठ सुळक्यांवर चढाई

CD

पिंपरी, ता.३१ ः गार्डियन गिरीप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनियरिंगच्यावतीने राबविल्या जाणाऱ्या डिप्लोमा इन माऊंटेनियरिंग आणि बेसिक रॉक क्लाइंबिंग कोर्सच्या विद्यार्थ्यांनी एव्हरेस्टवीर कृष्णा ढोकले यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्ह्यातील दुर्गम माहुली किल्ल्याजवळील ब्रम्हा, विष्णु, महेश, शंकर, पार्वती, वज्र, उंदीर आणि डमरू या आठ सुळक्यांवर तीन दिवसांत यशस्वी चढाई केली.
पायथ्याच्या वांद्रे गावातून तीन गावकऱ्यांच्या मदतीने वाट शोधत ५ तासांचा थकविणारा आणि शेवटच्या टप्प्यात तीव्र चढाई असलेला मोहीम करत चमू माहुली नवरा या सुळक्याच्या पोटातील कृत्रिम गुहेत पोहोचला. बेस कँप सेट करुन थोडी विश्रांती घेतल्यावर डॉ. प्रमोद पाटील यांनी गुहेपासून मुख्य सुळक्यांच्या पायथ्यापर्यंत पोहोचण्यासाठी रोप बांधून मार्ग सुरक्षित केला. सर्वप्रथम विष्णु सुळक्यावर प्रशांत पाटील यांनी चढाई सुरू केली. सुरवातीला चिमणी, नंतर घळ, तिरके आरोहण आणि पुन्हा चिमणी अशा मिश्र स्वरूपाच्या ३५० फूट चढाईनंतर सुळक्याच्या शोल्डरवर पोहोचले. मागोमाग कृष्णा ढोकले यांनी पुढील दगड-माती मिश्रित १०० फूट चढाई करत सुळक्याचा माथा गाठला. पुढे महेश सुळक्यावर सोपी चढाई करून पहिल्या दिवशीचे आरोहण पूर्ण केले.
दुसऱ्या दिवशी जुमरिंग करून सर्व चमू पाहिल्या सुळक्यावर (विष्णु) पोचला. त्यानंतर सचिन शहा, प्रशांत पाटील आणि कृष्णा ढोकले यांनी अनुक्रमे ब्रम्हा, शंकर, पार्वती आणि वज्र या सुळक्यांवर चढाई केली आणि दुसऱ्या दिवशीचे आरोहण पूर्ण केले. त्यानंतर पायथ्याला गुहेत मुक्काम केला.
तिसऱ्या आणि शेवटच्या दिवशी, मालोजी ढोकले या १४ वर्षांच्या बालगिर्यारोहकाने व डॉ. प्रमोद पाटील यांनी अनुक्रमे उंदीर आणि डमरू या १०० आणि ८० फूट उंच सुळक्यांवर आरोहण केले. या मोहिमेत एव्हरेस्टवीर कृष्णा ढोकले, डॉ. प्रमोद पाटील, सचिन शहा, प्रशांत पाटील, सुमल्या सरकार आणि मालोजी ढोकले (वय १४) यांच्यासह अन्य गिर्यारोहकांनी सुळक्यांवर चढाई केली. संतोष निगडे, प्रमोद सावंत यांचे सहकार्य लाभले. तर संपूर्ण मोहीम तेनसिंग नॉर्गे राष्ट्रीय साहस जीवन गौरव आणि शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने सन्मानित गिर्यारोहक उमेश झिरपे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडली.
PNE25V02192

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Exit Poll Predictions 2026 : पश्चिम बंगाल, आसाम, केरळ आणि तामिळनाडूमध्ये कोणाची सत्ता येणार? 'एक्झिट पोल'चे धक्कादायक आकडे, ममता बॅनर्जींच्या बालेकिल्ल्याला सुरुंग?

Exit Poll: बंगालमध्ये राजकीय थरार! BJP बहुमताच्या उंबरठ्यावर, TMC ला मोठा फटका; 15 वर्षांनंतर सत्ताबदलाचा भूकंप

Vidarbha Heatwave : विदर्भात उष्णतेची लाट कायम; बुधवारी सर्वाधिक तापमान चंद्रपुरात; अकोला, अमरावती किती?

Latest Marathi News Live Update: बंगळुरूत 'बोरिंग आणि लेडी कर्झन हॉस्पिटल'जवळ मोठी दुर्घटना, मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत

Nandur Sarpanch Election: दौंड तालुक्यातील नांदूर ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीचे विशाल थोरात सरपंचपदी विजयी; संतोष बबन बोराटे यांना धक्का

SCROLL FOR NEXT