जुनी सांगवी, ता. ३० ः पुणे जिल्हा रुग्णालय अंतर्गत खड्डेमय रस्त्यांचे डांबरीकरण केल्याने मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्ते चकाचक होत आहेत. सध्या उर्वरित दोन रस्त्यांचे काम सुरू आहे. साधारण आठ ते दहा दिवसांत शिल्लक रस्त्याचे काम पूर्ण होईल, असे सार्वजनिक बांधकाम विभागाने म्हटले आहे.
गेल्या वर्षभरापासून पुणे जिल्हा रुग्णालय अंतर्गत रस्त्यांवर खड्डे पडून दुरवस्था झाली होती. त्यामुळे, रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि नागरिकांना तेथून प्रवास करताना त्रास सहन करावा लागत होता. नवी सांगवी, पिंपळे गुरव परिसरात ये-जा करणाऱ्यांना देखील कसरत करावी लागत होती. त्यामुळे तेथील रस्ते दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांच्यावतीने वारंवार करण्यात येत होती. याबाबत ‘सकाळ’ मधून वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला. त्याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून येथील रस्ते दुरुस्ती कामे सुरू करण्यात आली. मुख्य रस्ता व त्यानंतर टप्प्याटप्प्याने अंतर्गत रस्ते करण्यात येत आहेत. त्यामुळे रहदारी सुकर होण्यास मदत होणार आहे. गतीने काम पूर्ण केल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
पुणे जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागांतून रुग्ण जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येतात. मुख्य रस्त्यासह जिल्हा रुग्णालयातील जोड सेवा रस्त्यांची दुरवस्था झाली होती. जिल्हा रुग्णालयामागे आयुष विभागाची स्वतंत्र इमारत आहे. अनेक रुग्ण आयुष विभागात उपचारासाठी येतात. मात्र, खड्डेमय रस्त्यांमुळे बिकट वाटेतून वाट काढत रुग्ण आणि त्यांच्या नागरिकांना जावे लागत होते.
पाच रस्त्यांचे डांबरीकरण
गेल्या एक महिन्यांपासून जिल्हा रुग्णालय अंतर्गत तेथील रस्ते दुरुस्ती कामे सुरू आहेत. मुख्य रस्त्याचे काम सर्वात आधी करण्यात आले. रुग्णवाहिका व इतर तातडीच्या रस्ते दुरुस्तीनंतर टप्प्या टप्प्याने एकूण पाच रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले आहे. त्यात जिल्हा आयुष विभाग रस्ता, मुख्य रस्ता, शवागार रस्ता करण्यात आला आहे.
गेल्या हंगामातील पावसाळ्यात येथून चालणेही जिकिरीचे होते. रस्त्यावर पडलेले खड्ड्यांमुळे रूग्ण, त्यांचे नातेवाईक इतर नागरिकांना कसरत करावी लागत होती. रस्ते दुरुस्ती झाल्याने येथील रहदारीचा त्रास कमी झाला आहे.
- अरुण शिंदे, नागरिक, जुनी सांगवी
मुख्य रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे. अंतर्गत रस्ते डांबरीकरणाचे काम टप्प्याटप्प्याने सुरू आहे.
- अनिल गाडे, अभियंता (स्थापत्य), सार्वजनिक बांधकाम विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.