गुढीपाडव्याच्या निमित्ताने
शाश्वत विकासाचा संकल्प
आमदार लांडगे यांनी गुढी उभारून दिल्या शुभेच्छा
पिंपरी, ता. ३० ः चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आमदार महेश लांडगे यांनी भोसरीतील निवासस्थानी आणि जनसंपर्क कार्यालयासमोर गुढी उभारून पिंपरी-चिंचवड शहराच्या शाश्वत विकासाचा संकल्प सोडला. आगामी काळात हिंदू धर्माचा जाज्वल्य अभिमान बाळगत शहर विकासासाठी भाजप महायुती सरकारच्या माध्यमातून चांगल्या संकल्पनांना मूर्त स्वरूप देण्याचे काम केले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शहरातील नागरिकांनी त्यांनी शुभेच्छा दिल्या आणि स्वीकारल्या. कुटुंबीय, सहकारी तसेच नागरिकांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी आगामी काळात शहराच्या दृष्टीने पाण्याचे काटेकोर नियोजन करणे, पाण्याचे नवे स्त्रोत शहरासाठी उपलब्ध होतील यासाठी पाठपुरावा करणे. संविधान भवन, न्यायालय इमारत, मोशी हॉस्पिटल, भोसरी विधानसभा मतदारसंघातील उपनगरातून शहराला जोडणारे नवे रस्ते तयार करणे या गोष्टींना प्राधान्य देण्याचा संकल्पही केला.
आमदार लांडगे म्हणाले, ‘‘धर्म रक्षणाची साद घालणारा, मराठी अस्मिता सांगणारा, नवचैतन्याची उभारी देणाऱ्या हिंदू नववर्षाच्या पहिल्या दिवशी अर्थात गुढीपाडव्याच्या निमित्ताने शहर विकासाचा संकल्प केला आहे. पिंपरी-चिंचवड शहराला मोठे पोटेन्शिअल आहे. या शहराचा विकासाचा वेग लक्षात घेऊन त्या दृष्टीने नियोजन आणि अंमलबजावणी योग्य रितीने व्हावी या दृष्टीने लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याचा संकल्प केला आहे.’’
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.