यशोदा मानवी दुग्धपेढीचे उद्घाटन
(डी. वाय. पाटील हॉस्पिटल)
डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय रुग्णालयात इनर व्हील क्लब ऑफ निगडी प्राइड च्या वतीने सुरु केलेल्या यशोदा मानवी दुग्ध पेढीचे उद्घाटन करण्यात आले. डॉ. आशा देशपांडे, अलका करकरे, श्रीकृष्ण करकरे, हॉस्पिटलच्या डॉ. भाग्यश्री पाटील आणि डॉ. शैलजा माने, हरबिंदर सिंग, क्लबच्या अध्यक्षा कमलजित कौर यांनी या प्रकल्पासाठी सहकार्य केले.
दीपाली जाधव, मुक्ती पानसे, आरती मुळे, सविता राजापूरकर, जयश्री कुलकर्णी, रवी राजापुरकर यांच्या समन्वयातून प्रकल्प यशस्वीपणे राबविण्यात आला. ही अत्याधुनिक मिल्क बँक नवजात बालकांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे, विशेषतः ज्या मातांना वैद्यकीय कारणांमुळे स्तनपान देता येत नाही अशा बालकांसाठी हा प्रकल्प महत्त्वाचा जीवनदायी ठरेल.
PNE25V62660
ब्रेड प्रदर्शनातून शेतकरी बचावाचा संदेश
(कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे डॉ. अरविंद ब. तेलंग इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट)
संभाजीनगर येथील कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे डॉ.अरविंद ब. तेलंग इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट येथे जागतिक ब्रेड दिन निमित्त ब्रेड प्रदर्शनातून शेतकरी वाचवण्याचा संदेश विद्यार्थ्यांनी दिला. या वर्षीचा विषय होता ‘सर्वोत्तम स्थानिक अन्नासाठी स्थानिक शेतकरी वाचवा.’
कार्यक्रमाला रॅडीसन ब्लूचे शेफ मोहम्मद आझम आणि महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ. अजयकुमार राय उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी शेफ जेकब साळवे यांच्या मदतीने इटली, अमेरिका, फ्रान्स ,भारत अशा विवध देशांतील केक बनवले होते, त्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले. ब्रेड हे हॉटेल उद्योगातील महत्त्वाचे उत्पादन असल्यामुळे ते काळजीपूर्वक हाताळले पाहिजे, असे मोहम्मद यांनी नमुद केले. विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवरील ब्रेडची आणि बेकरीची माहिती मिळावी, यामागील हेतू असल्याचे राय यांनी सांगितले.
PNE25V62659
वृद्धाश्रमात विद्यार्थ्यांची दिवाळी साजरी
(डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी)
आकुर्डी येथील विद्यार्थ्यांनी रूतुरंग सोशल फाउंडेशन द्वारे संचालित अमृतवेल वृद्धाश्रम येथील ज्येष्ठांसोबत दिवाळी साजरी केली. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी वृद्धाश्रमात स्वच्छता मोहीम राबवली आणि वृक्षारोपण केले. तसेच आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना, आयु रक्षक क्लब आणि जॉय मेकर्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. या सामाजिक उपक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये समाजसेवेची भावना दृढ होईल, असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नीरज व्यवहारे यांनी सांगितले. मुकेश मोहिते, आशिष चिंबाळकर, कल्याणी सहारे आणि अभय शिंदे यांनी नियोजन केले.
PNE25V62662
आंतरमहाविद्यालयीन बुक टॉक स्पर्धा
(एम. आय. टी. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय)
एम. आय. टी. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ग्रंथालय विभाग तसेच सायन्स आणि कॉम्प्युटर सायन्स विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आंतरमहाविद्यालयीन बुक टॉक’ स्पर्धा पार पडली. एकूण ३६ विद्यार्थ्यांनी भगवद्गीता, इंग्रजीतील नामांकित लेखकांची पुस्तके तसेच विविध प्रेरणादायी ग्रंथावर विचार सादर केले. स्पर्धेत दिया चौधरी प्रथम, श्रीप्रिया पिल्ले द्वितीय तर महेश खताने तृतीय क्रमांकाचे विजेते ठरले. विजेत्यांना रोख पारितोषिक तसेच प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेचे मूल्यमापन संत ज्ञानेश्वर बी. एड. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. समाधान निकम यांनी केले. स्वागत संचालक डॉ. बी. बी. वाफारे यांनी केले. सूत्रसंचालन आयत संकर, श्रावणी नेहरकर आणि शरण्या नायर यांनी केले. प्रास्ताविक ग्रंथपाल डॉ. राहुल बाराथे यांनी केले. या प्रसंगी संचालिका डॉ. अक्षदा कुलकर्णी, डॉ. संगीत बोर्डे व डॉ. पदमावती उंडाळे उपस्थित होत्या. कल्पना लामतुरे, रोहिणी पोकळे आणि सुवर्णा सानप यांनी नियोजन केले.
PNE25V62661
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.